

पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसमध्ये फूट
२० खासदारांनी बनवला वेगळा गट
लोकसभेत खासादारांच्य नवा गटाची स्थापना झाल्याने राजकारणात खळबळ
पश्चिम बंगालच्या विधानसभा विधानसभा निवडणुकीनंतर टीएमसी आमदारांमध्ये फूट पडल्यानंतर आता खासदारांमध्येही फूट पडली आहे. तृणमूल काँग्रेस बंडखोर खासदारांची केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्या घरी बैठक झाली. या बैठकीत पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी देखील उपस्थित होते. भूपेंद्र यादव यांच्या घरातील बैठकीनंतर तृणमूल काँग्रेसच्या वरिष्ठ खासदार काकोली घोष दस्तीदार यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र दिलं. या पत्रात २० खासदारांच्या सह्या आहेत. काकोली घोष दस्तीदार यांनी वेगळा गट स्थापन केल्याचा दावा केला आहे. यामुळे देशाच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
ममता बॅनर्जी या इंडिया आघाडीच्या बैठकीला हजर होत्या. दुसरीकडे बंडखोर खासदारांनी वेगळा गट स्थापन करण्याविषयी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहिलं. त्यांनी तृणमूल काँग्रेसपासून वेगळे झाल्याचे स्पष्ट केले. त्यांनी सोमवारी दुपारी १२.५३ वाजता पत्र दिलं.
लोकसभेत तृणमूल काँग्रेसचे एकूण २८ खासदार आहेत. काकोली यांनी म्हटलं की, २० खासदारांनी सह्या केलेलं पत्र लोकसभा अध्यक्षांना दिलं'. या पत्रावर कोणी कोणी सही केली, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. सूत्रांच्या माहितीनुसार, यादीत काकोली घोष दस्तीदार, प्रसून बॅनर्जी, पार्थ भौमिक, शर्मिला सरकार, असिल माल जगदीश बसुनिया, कालीपद सोरेन, अरुप चक्रवर्ती, रचना बॅनर्जी, देव यांचा समावेश आहे. तर टीएमसीचे राज्यसभेचे खासदार सुखेंदू शेखर रॉय यांनी आधी पदाचा राजीनामा दिला आहे.
कोकोली घोषण यांनी पत्रात म्हटलं की, 'आम्ही भाजपमध्ये सामील होत नाही. परंतु आम्ही एनडीए पक्षात सामील होऊ. त्यांनी तृणमूल काँग्रेसपासून वेगळा गट तयार करू. त्यासोबत एनडीएचा भाग बनू'. तत्पूर्वी, लोकसभा अध्यक्ष ओम बिरला सोमवारी लोकसभेत नव्हते. ते दुसऱ्या राज्यात एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गेले. त्यामुळे कोकोली यांनी पत्र त्यांच्या कार्यालयात जमा केलं'.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.