Sanjay Singh
Sanjay SinghSaam Tv

Sanjay Singh: 'ही वेळ संघर्षाची आहे, उत्सवाची नाही', तिहारमधून बाहेर पडताच संजय सिंह यांचं पहिलं वक्तव्य

AAP Party News: आम आदमी पक्षाचे नेते आणि राज्यसभा खासदार संजय सिंह बुधवारी रात्री तिहार तुरुंगातून बाहेर आले आहेत. यावेळी कारागृहाबाहेर उपस्थित आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले.
Published on

Sanjay Singh News:

आम आदमी पक्षाचे नेते आणि राज्यसभा खासदार संजय सिंह बुधवारी रात्री तिहार तुरुंगातून बाहेर आले आहेत. यावेळी कारागृहाबाहेर उपस्थित आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले. आता संजय सिंह मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरी जाऊन सुनीता केजरीवाल यांची भेट घेणार आहेत, असं सांगण्यात येत आहे.

तिहार तुरुंगातून बाहेर आल्यानंतर खासदार संजय सिंह कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हणाले की, ''ही वेळ उत्सवाची नसून संघर्षाची आहे. जेल के ताले टूटेंगे, सारे नेता छूटेंगे.'' तिहार तुरुंगाबाहेर आम आदमी पक्षाचे (आप) कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमले आहेत. त्यांनी संजय सिंह यांचे स्वागत केले.  (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Sanjay Singh
Telangana News: तेलंगणात केमिकल फॅक्टरीत भीषण स्फोट; 5 जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी

यावेळी संजय सिंह म्हणाले, आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते अरविंद केजरीवाल, सत्येंद्र जैन आणि मनीष सिसोदिया यांना तुरुंगात डांबण्यात आले आहे. तेही लवकरच तुरुंगातून लवकरच बाहेर येतील, असा मला विश्वास आहे.  (Latest Marathi News)

याचबद्दल बोलताना आपचे नेते सौरभ भारद्वाज म्हणाले की, ''संजय सिंह नुकतेच तुरुंगातून बाहेर आले असून हजारो कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले. ते (संजय सिंह) म्हणाले की, ही वेळ उत्सवाची नसून संघर्षाची आहे. आमचे तीन प्रमुख नेते अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन अजूनही तुरुंगात आहेत. जोपर्यंत त्याची सुटका होत नाही, तोपर्यंत आम्ही आनंदोत्सव साजरा करणार नाही, आम्ही संघर्ष करत राहू.''

Sanjay Singh
Heatwave Warning: देशभरात वाढला तापमानाचा पारा, केंद्र सरकारची राज्यांना अ‍ॅडव्हायझरी; दिल्या महत्त्वाच्या सूचना

सहा महिन्यांनंतर मुलगा तुरुंगातून बाहेर आल्यानंतर संजय सिंह यांचे वडील दिनेश सिंह म्हणाले की, ''मी, माझे कुटुंब, पक्ष कार्यकर्ते आणि पक्ष याकडे विशेष क्षण म्हणून पाहतो.'' यावेळी आप कार्यकर्त्यांनी आणि संजय सिंह यांच्या समर्थकांनी दिनेश सिंह यांच्यावर पुष्पवृष्टी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com