प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो Saam tv

Telangana News: तेलंगणात केमिकल फॅक्टरीत भीषण स्फोट; 5 जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी

Factory Fire News: तेलंगणातील संगारेड्डी जिल्ह्यात एका केमिकल कारखान्यात फॅक्टरीत स्फोट होऊन पाच जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

Telangana News:

तेलंगणातील संगारेड्डी जिल्ह्यात एका केमिकल कारखान्यात फॅक्टरीत स्फोट होऊन पाच जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याबाबत माहिती देताना स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, अजून आठ ते दहा लोक अडकले आहेत. याचा अर्थ मृतांची संख्या वाढू शकते.

स्फोटाच्या वेळी इमारतीत 50 लोक होते, असं स्थानिकांनी सांगितलं आहे. एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, इमारतीतील पुढील भागातही स्फोट होण्याची भीती आहे, त्यामुळे आजूबाजूच्या भागातून लोकांना बाहेर काढण्यास सुरुवात करण्यात आली आहे. जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

प्रातिनिधिक फोटो
Heatwave Warning: देशभरात वाढला तापमानाचा पारा, केंद्र सरकारची राज्यांना अ‍ॅडव्हायझरी; दिल्या महत्त्वाच्या सूचना

एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले की, “फार्मास्युटिकल कंपनीच्या रिॲक्टरमध्ये स्फोट झाला आणि स्फोटाच्या प्रभावामुळे आजूबाजूचे लोक दूर फेकले गेले. आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. यात10 ते 15 लोक जखमी झाले आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे."  (Latest Marathi News)

प्रातिनिधिक फोटो
Recruitment News: सरकारी नोकरी करण्याची सुवर्णसंधी; रेल्वेत 9144 पदांसाठी भरती, जाणून घ्या अर्ज कसा आणि केव्हा करायचा

तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी आज अपघाताचा आढावा घेतला. या अपघाताची माहिती अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना दिली. मुख्यमंत्री कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्र्यांनी अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने बचाव कार्याला गती देण्याचे आणि आगीवर नियंत्रण मिळवण्याचे आदेश दिले. अपघातात जखमी झालेल्यांना वैद्यकीय सेवा देण्याचे निर्देशही त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com