Recruitment News: सरकारी नोकरी करण्याची सुवर्णसंधी; रेल्वेत 9144 पदांसाठी भरती, जाणून घ्या अर्ज कसा आणि केव्हा करायचा

RRB Technician Recruitment: सरकारी नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय रेल्वेने टेक्निशियन पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे.
RRB Technician Recruitment 2024
RRB Technician Recruitment 2024Saam Tv

RRB Technician Recruitment 2024:

सरकारी नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय रेल्वेने टेक्निशियन पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. नोकरी मिळवण्याचे स्वप्न पाहणारे तरुण रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ८ एप्रिलपर्यंत अर्ज करू शकतात.

भारतीय रेल्वे 9 हजार 144 पदांची भरती करणार आहे. भारतीय रेल्वेने टेक्निशियन ग्रेड-I सिग्नलच्या 1092 पदांसाठी आणि टेक्निशियन ग्रेड-III सिग्नलच्या 8052 पदांसाठी भरती होणार आहे.  (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

RRB Technician Recruitment 2024
Intelligence Bureau Recruitment: इंटेलिजन्स ब्युरोमध्ये 660 पदांसाठी भरती, अर्ज कसा करायचा? जाणून घ्या संपूर्ण माहिती

कसा करायचा अर्ज?

भारतीय रेल्वे भर्ती बोर्डाने टेक्निशियन ग्रेड 2024 साठी भरती अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. तुम्ही रेल्वेच्या अधिकृत वेबसाइट https://www.rrbapply.gov.in/#/auth/ वर जाऊन अर्ज करू शकता. ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ एप्रिल आहे.  (Latest Marathi News)

वयोमर्यादा किती आहे?

भरतीसाठी उमेदवार 10वी उत्तीर्ण तसेच आयटीआय पदवीधारक असावा. 18 ते 36 वयोगटातील लोक टेक्निशियन ग्रेड भरतीसाठी अर्ज करू शकतात.

RRB Technician Recruitment 2024
Rahul Gandhi: राहुल गांधींनी वायनाडमधून दाखल केला उमेदवारी अर्ज; मात्र यंदा जिंकणं आहे अवघड, का? ते जाणून घ्या

किती मिळणार पगार?

टेक्निशियन ग्रेड-I ला लेव्हल -5 नुसार दरमहा रुपये 29,200 पगार दिला जाईल. टेक्निशियन ग्रेड-III ला लेव्हल-5 नुसार दरमहा रुपये 19,900 पगार दिला जाईल.

कोणत्या उमेदवारांना वयात सवलत मिळेल?

एससी/एसटी- ५ वर्षांची सूट

एक्स सर्व्हिसमन – ३ ते ८ वर्षे सूट

अपंग - ८ ते १५ वर्षे सूट

भरतीसाठी अर्ज शुल्क

एससी/एसटी, एक्स सर्व्हिसमन, आर्थिकदृष्ट्या मागास, अल्पसंख्याक, महिला ट्रान्सजेंडर यांना 250 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. तर इतर उमेदवारांना अर्जासाठी 500 रुपये शुल्क भरावे लागेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com