

थायलंडमध्ये १४ वर्षीय विद्यार्थ्याने शाळेत गोळीबार केला
आधी आजी-आजोबांची हत्या करून नंतर शाळेत गोळीबार केला
गोळीबारात पाच शिक्षकांचा मृत्यू
गोळीबारामध्ये १५ जण जखमी झालेत
शाळेमध्ये रक्तरंजित थराराची थरकाप उडवणारी घटना थायलंडमध्ये घडली. १४ वर्षांच्या विद्यार्थ्याने आधी घरी आजी-आजोबांची हत्या केली. त्यानंतर शाळेमध्ये येऊन त्याने अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारामध्ये त्याने ५ शिक्षकांची हत्या केली. थायलंडची राजधानी बँकॉकमधील एका शाळेमध्ये ही भयंकर घटना घडली. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार, थायलंडच्या आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, नववीत शिकणाऱ्या एका १४ वर्षीय विद्यार्थ्याने आधी आपल्या आजी-आजोबांची गोळ्या झाडून हत्या केली. त्यानंतर तो ऐवढ्यावर थांबला नाही. तो थायलंडच्या नॉनथाबुरी प्रांतातील शाळेमध्ये गेला आणि त्याठिकाणी त्याने अंदाधुंद गोळीबार करत ५ शिक्षकांना संपवलं. सात जणांची हत्या केल्यानंतर या विद्यार्थ्याने आत्महत्या केली.
थायलंड पोलिसांनी सांगितले की, हल्लेखोर विद्यार्थ्याने वापरलेली ९ एमएमची हँडगन त्याच्या आजोबांची होती. त्याचे आजोबा शिक्षक होता. स्थानिक वेळेनुसार सकाळी १० वाजताच्या सुमारास ही गोळीबाराची घटना घडली. या गोळीबारामध्ये सात जणांचा मृत्यू झाला तर १५ जण जखमी झालेत. जखमींमधील एकाची प्रकृती गंभीर आहे. या गोळीबारानंतर शाळेत एकच गोंधळ उडाली. सर्व विद्यार्थी सैरावैरा पळू लागले.
पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिस पोहचण्यापूर्वीच या विद्यार्थ्याने आत्महत्या केली. प्रसिद्ध शाळेमध्ये ही गोळीबाराची घटना घडल्यामुळे थायलंड हादरले. सुरूवातीला शाळेतील विद्यार्थ्यांना वाटत होते की कुठे तरी फटाके फोडले जात आहे. आम्हाला वाटले नव्हते की तो बंदुकीचा आवाज आहे. त्यानंतर सगळीकडे शांतता पसरली. पाच शिक्षक रक्ताच्या थारोळ्यात पडले होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.