काळजाचा थरकाप उडवणारा अपघात; ८ जणांनी गमावला जीव; पंतप्रधान मोदींकडून तातडीने मोठी घोषणा

Tamil Nadu Road Accident Today : तामिळनाडूच्या तिरुचिरापल्ली जिल्ह्यात मुसिरीजवळ व्हॅन झाडाला धडकून झालेल्या भीषण अपघातात आठ जणांचा मृत्यू, तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत.
Tamil Nadu Road Accident Today
Tamil Nadu Road Accident Today
Published On: 

Tamil Nadu van accident kills eight people near Musiri : तामिळनाडूमध्ये रविवारी झालेल्या एका भीषण अपघातात ८ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर २ जण गंभीर जखमी झाले आहेत. या भीषण अपघातानंतर संपूर्ण तिरुचिरापल्ली परिसरात शोककळा पसरली आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य केले. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २ लाख रुपये आणि जखमींना ५० हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.

तामिळनाडूच्या तिरुचिरापल्ली जिल्ह्यातील मुसिरी जवळ रविवारी व्हॅन अनियंत्रित होऊन झाडाला धडकली. या अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला. तर दोन जण जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. थुरैयूर-मुसिरी रस्त्यावर जंबुनाथपुरमजवळ हा अपघात झाला. व्हॅनची धडक इतकी जोरदार होती की, पाच जणांचा जागीच मृत्यू झाला, तर जखमींना उपचारासाठी जवळच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारावेळी ३ जणांचा मृत्यू झाला. तर २ जणांवर उपचार सुरू आहेत.

या दुर्घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून (PMO) याबाबत अधिकृत माहिती देण्यात आली आहे. मृतांच्या कुटुंबीयांना या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो, अशी प्रार्थना पंतप्रधानांनी केली आहे. तसेच, जखमींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. या अपघातातील पीडितांसाठी केंद्र सरकारने आर्थिक मदतीचा हात पुढे केला आहे. पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून (PMNRF) मृतांच्या वारसांना प्रत्येकी २ लाख रुपये, तर गंभीर जखमी झालेल्यांना प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

Tamil Nadu Road Accident Today
Ramrao Vadkute Passes Away: भाजप खासदार रामराव वडकुतेंचं मध्यरात्री निधन, महाराष्ट्रावर शोककळा

प्राथमिक माहितीनुसार, तामिळनाडूमधील नामक्कल जिल्ह्यात एका कौटुंबिक कार्यक्रमाला हजेरी लावून प्रवासी तंजावर जिल्ह्यातील तिरुक्कट्टुपल्ली येथे परत येत होते. त्याचवेळी चालकाचे व्हॅनवरील नियंत्रण सुटले. व्हॅन रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडाला जोरात धडक दिल्याने अपघात झाला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य केले. मृतदेह पोस्टार्टमसाठी रूग्णालयात पाठवले. पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.

Tamil Nadu Road Accident Today
महाराष्ट्रात खळबळ! भाजपच्या महापौरांनी प्राशन केलं विष; आमदारांचा धक्कादायक खुलासा, नेमकं प्रकरण काय?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.