मुख्यमंत्रि‍पदाची शपथ घेतली अन् पुढच्या मिनिटाला ३ मोठ्या निर्णयांवर सह्या, थलपती विजय ठरले 'नायक'

TVK party latest news : तामिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर थलपती विजय यांनी अवघ्या काही मिनिटांत ३ मोठ्या निर्णयांवर स्वाक्षऱ्या केल्या.
Thalapathy Vijay CM, Tamil Nadu government
Thalapathy Vijay CM, Tamil Nadu government ANI
Published On

Thalapathy Vijay CM, Tamil Nadu government : टीव्हीके पक्षाचे प्रमुख थलपती विजय यांनी तामिळनाडूचे नववे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी विजय यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह अनेक दिग्गज नेते शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते. मुलाला शपथ घेताना पाहून वडील चंद्रशेखर यांना अश्रू अनावर आले. विजय यांच्या शपथविधी सोहळ्यातील फोटो आणि क्षण सोशल मिडिया व्हायरल झाले आहेत. शपथविधी सोहळ्यानंतर मुख्यमंत्री म्हणून विजय यांनी महत्त्वाचे ३ निर्णय घेत सर्वांनाच सुखद धक्का दिला. प्रचारात दिलेल्या आश्वासन विजय यांनी शपथ घेतल्यानंतर पुढच्याच महिन्यात पूर्ण केले. याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. मुख्यमंत्री असावा तर असा, असे म्हणत प्रत्येकजण कौतुक करत आहे.

विजय यांनी कोणते ३ निर्णय घेतले?

तमिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर टीव्हीके (TVK) प्रमुख सी. जोसेफ विजय यांनी ३ महत्त्वाचे निर्णय घेतला. मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर पुढीच्याच काही मिनिटात विजय यांनी ३ निर्णायांवर स्वाक्षरी केल्या.

१. २०० युनिट मोफत वीज पुरवठा. (200 units of free power supply )

२. अमली पदार्थांचा नायनाट करण्यासाठी विशेष टास्क फोर्सची स्थापना. (Special task force to tackle drugs)

३. महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष टास्क फोर्सची नियुक्ती. (Special task force to ensure women's safety)

मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर थलपथी विजय यांनी २०० युनिट मोफत वीज देण्याच्या निर्णयावर स्वाक्षरी करून आश्वासन पूर्ण केले. त्यांनी महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष दल स्थापन करण्यासंबंधीच्या फाईलही मंजूरी दिली. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर विजय म्हणाले की, कोणत्याही राजघराण्यातून आलेले नसतानाही जनतेने त्यांना स्वीकारले आहे.

Thalapathy Vijay CM, Tamil Nadu government
Thane : ठाण्यात बिबट्याची दहशत! वागळे इस्टेट परिसरात पाणी पिताना दिसला; व्हिडिओ व्हायरल

पंतप्रधान मोदींनी केले अभिनंदन -

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी तामिळनाडू वेत्री कळघम (टीव्हीके) चे प्रमुख सी. जोसेफ विजय यांचे तामिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल अभिनंदन केले. लोकांचे राहणीमान सुधारण्यासाठी केंद्र सरकार राज्य सरकारसोबत मिळून काम करत राहील, असे म्हटले.

Thalapathy Vijay CM, Tamil Nadu government
Breaking : कॅबिनेट मंत्री सुधाकर यांचे निधन; फुफ्फुसाच्या संसर्गाशी झुंज ठरली अपयशी, राजकीय वर्तुळावर शोककळा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com