Tamil Nadu Car Accident
Tamil Nadu Car AccidentSaamtv

Tamil Nadu Accident: सुसाट कार थेट ट्रकमध्ये घुसली.. एकाच कुटूंबातील ६ जणांचा मृत्यू; थरकाप उडवणारा VIDEO समोर

Tamil Nadu Car Accident Viral Video: कार आणि ट्रकमध्ये झालेल्या भयंकर धडकेत एकाच कुटूंबातील सहा जणांचा जागीच मृत्यू झाला

Tamil Nadu Accident: तामिळनाडूमधून एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. तामिळनाडू सेलममध्ये हा भयंकर अपघात झाला. कार आणि ट्रकमध्ये झालेल्या भयंकर धडकेत एकाच कुटूंबातील सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Car Accident Viral Video)

Tamil Nadu Car Accident
Manoj Jarange Patil Protest: जीआर काढले, पण सरकारच्या २ गोष्टी मनोज जरांगेंना खटकल्या; उपोषणावर ठाम

याबाबत सविस्तर माहिती अशी की, तामिळनाडूतील (Tamil Nadu) येंगूर येथील एक कुटुंब गाडीतून पेरुनथुराईला त्यांच्या मुलीच्या घरी निघाले होते. सालेम-कोइम्बतूर राष्ट्रीय महामार्गावर कौंदनूर रोड परिसरात संकगिरीच्या पुढे जात असताना त्यांची गाडी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला धडकली.

पहाटे चारच्या सुमारास ही घटना घडली. या भीषण धडकेत (Car Accident) गाडीतील दहापैकी सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये एका सहा वर्षाच्या लहान मुलीचाही समावेश आहे. ही धडक इतकी भीषण होती की कारचा अक्षरशः चक्काचूर झाला. अपघातातील इतर जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Tamil Nadu Car Accident
Electric Shock: सफाई करताना शॉक लागल्याने कामगाराचा मृत्यू; शेतातील तारकुंपणात सोडला होता वीज प्रवाह

व्हिडिओ व्हायरल..

ही भयंकर अपघाताची घटना सीसीटिव्ही (CCTV) कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचा व्हिडिओ सध्या समोर आला आहे. व्हिडिओमध्ये (Viral Accident Video) रस्त्याच्या कडेला लावलेल्या ट्रकवर पाठीमागून सुसाट वेगात असलेली कार आदळल्याचे दिसत आहे.

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेत जखमींना रुग्णालयात दाखल केले. चालकाला झोप लागल्याने ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केली आहे. दुर्दैवी घटनेत एकाच कुटूंबातील सहा जणांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com