Electric Shock: सफाई करताना शॉक लागल्याने कामगाराचा मृत्यू; शेतातील तारकुंपणात सोडला होता वीज प्रवाह

Jalgaon News : सफाई करताना विद्युत शॉक लागल्या कामगाराचा मृत्यू; शेतातील तारकुंपणात सोडला होता वीज प्रवाह
Electric Shock
Electric ShockSaam tv
Published On

जळगाव : शेताला असलेल्या तार कंपाऊंडमध्ये विद्युत प्रवाह सोडला होता. या तर कंपाऊंडच्या तारेला स्पर्श होऊन गटार साफ (Electric Shock) करणाऱ्या कामगाराचा नृत्यू झाल्याची घटना जळगाव (Jalgaon) तालुक्यातील नशिराबाद येथे घडली. या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी शेतकऱ्याला बेदम मारहाण केली. (Live Marathi News)

Electric Shock
Beed Maratha Morcha: बीडमध्ये मराठा आंदोलनाला हिंसक वळण; मध्यरात्री एसटी बस पेटवली, थरारक VIDEO आला समोर

जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथील विशाल चिरावंडे असे मृत झालेल्या कामगाराचे नाव आहे. चिरावांडे दोन वर्षांपासून नशिराबाद नगरपंचायतीमध्ये कंत्राटी सफाई कर्मचारी म्हणून काम करत होते. नशिराबाद गावाजवळील दिलीप शांताराम कुळकर्णी यांचे (Farmer) शेत असून, त्यांचे शेत सोपान विठोबा वाणी यांनी नफ्याने करण्यासाठी घेतले आहे. वाणी यांनी शेताला तारांचे कुंपण केले. त्यात वीजप्रवाह सोडण्यात आला आहे. याच कुंपणाला लागून विशाल चिरावंडे गटारीचे काम करीत असताना त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला. 

Electric Shock
Dhule Accident News: दुचाकीची समोरासमोर धडक; एकाचा जागीच मृत्यू

नागरिकांनी नेले रुग्णालयात 

विशालला विजेचा जोरदार धक्का लागल्याचे आजूबाजूच्या नागरिकांच्या लक्षात आल्याने त्यांना खासगी वाहनातून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. तपासणी अंती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले. रुग्णालयात नातेवाइकांनी आक्रोश केला. याबाबत नशिराबाद पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.

परस्पर विरोधी तक्रार 

शेत नफ्याने करत असलेल्या सोपान वाणी याने शेताच्या बांधाला लाकडी पोल ठोकून त्यांना तारांचे कुंपण करून त्यात वीजप्रवाह सोडला होता. वीजप्रवाह बंद न केल्यामुळे सफाई कामगार विशाल चिरावंडे यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूला जबाबदार सोपान वाणी याच्याविरुद्ध (कलम ३०४) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर गटार साफ करताना मजुराचा मृत्यूला जबाबदार समजून सोपान वाणी या शेतकऱ्याला ग्रामस्थांनी बेदम मारहाण करून जखमी केले. वाणी यांच्या तक्रारीवरून नशिराबाद पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com