Manoj Jarange Patil Protest: जीआर काढले, पण सरकारच्या २ गोष्टी मनोज जरांगेंना खटकल्या; उपोषणावर ठाम

Manoj Jarange Patil Press Conference: ज्यांच्याकडे निजाम काळातील महसुली आणि शैक्षणिक नोंदी आहेत त्यांना कुणबी दाखला देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती,
Manoj Jarange Patil Press Conference On Maratha Reservation
Manoj Jarange Patil Press Conference On Maratha ReservationSaam Tv
Published On

Maratha Reservation Protest: मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मराठा समाजाला कुणबी जातीचं प्रमाणपत्र मिळावे या मागणी करिता मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातआमरण उपोषण सुरू केले आहे.

या उपोषणाचा आजचा १० वा दिवस आहे. काल ज्यांच्याकडे निजाम काळातील महसुली आणि शैक्षणिक नोंदी आहेत त्यांना कुणबी दाखला देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. त्यांच्या या निर्णयाचे मनोज जरांगे पाटील यांनी स्वागत केले आहे. (Maratha Reservation)

Manoj Jarange Patil Press Conference On Maratha Reservation
Beed Maratha Morcha: बीडमध्ये मराठा आंदोलनाला हिंसक वळण; मध्यरात्री एसटी बस पेटवली, थरारक VIDEO आला समोर

काय म्हणाले जरांगे पाटील?

"मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी काल मराठा समाजाच्या संदर्भात निर्णय घेतले, अध्यादेश काढले. जीआर संदर्भात (GR) अधिकृत माहिती आलेली नाही. कालच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो, मात्र ज्यांच्याकडे वंशावळी असतील त्यांना प्रमाणपत्र देण्यात येईल, असा निर्णय आहे. त्यामुळे झालेल्या निर्णयाचा आम्हाला काहीच फायदा नाही."

वंशावळ शब्द काढून टाका...

"सरकारचा निर्णय चांगला आहे. आम्ही दहा पावले मागे यायला तयार आहोत, मात्र त्यामध्ये थोडी सुधारणा करा. जिथं वंशावळी शब्द आहे, त्या दोन शब्दाच्या जागेवर थोडी सुधारणा करा, वंशावळ शब्द काढून टाका" असे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यावेळी म्हणाले.

Manoj Jarange Patil Press Conference On Maratha Reservation
Talathi Viral Video: दारु पिऊन कार्यालयात आला, सातबाऱ्यावर सही करताना खुर्चीवरुन पडला; मद्यधुंद तलाठ्याचा VIDEO

आंदोलनावर ठाम....

"सरकारी जीआरमध्ये बदल करुन वंशावळीचे दस्तावेज शब्द काढून सरसकट करावे, तो जीआर तुम्ही घेवून या अथवा कुणालाही पाठवा, तसेच आंदोलकांवर केलेले गुन्हे मागे घ्या.. तशाप्रकारचा जीआर निघेपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे मनोज जरांगे पाटील म्हणाले, तसेच चर्चेसाठी आम्ही तुम्हाला निमंत्रण देत असल्याचेही ते यावेळी म्हणाले. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com