French President Macron: मोठी बातमी! राष्ट्राध्यक्ष असलेल्या हॉटेलजवळ स्फोट; जगभरात खळबळ

French President Macron: सीरियाची राजधानी दमास्कस येथील एका हॉटेलबाहेर दोन स्फोट झाले. मिळालेल्या माहितीनुसार, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन याच हॉटेलमध्ये होते. या स्फोटांची जबाबदारी अद्याप कोणत्याही संघटनेने स्वीकारलेली नाही.
French President Macron:
Explosions near hotel hosting Emmanuel Macron in Syriasaam tv
Published On
Summary
  • दमास्कस येथील एका हॉटेलजवळ दोन स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे.

  • राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन सीरिया दौऱ्यादरम्यान याच हॉटेलमध्ये वास्तव्यास होते.

  • स्फोटांनंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या असून परिसरात तपास सुरू करण्यात आला आहे.

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन सीरियाच्या दौऱ्यावर आले आहेत. मॅक्रॉन ज्या हॉटेलमध्ये राहत होते, त्याच हॉटेलजवळ दोन स्फोट झालेत. सीरियातील दमास्कसमध्ये झालेल्या स्फोटामुळे जगात खळबळ उडाली आहे. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष एका महत्त्वपूर्ण दौऱ्यादरम्यान सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांची भेट घेत होते. इमॅन्युएल मॅक्रॉन हे सीरियाचे राष्ट्राध्यक्ष अहमद अल-शारा यांची भेट घेण्यासाठी राष्ट्राध्यक्षांच्या भवनात दाखल झाले होते, त्याचेवळी 'फोर सीझन्स हॉटेल'जवळ दोन स्फोट झाले.

French President Macron:
साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात कोर्टाचा मोठा निर्णय, ३८ दहशतवाद्यांना फाशी, ११ जणांना जन्मठेप

सीरियन अधिकाऱ्यांनी या घटनेवर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाहीये. मॅक्रॉन हे 'फोर सीझन्स'मध्येच वास्तव्यास होते, असे वृत्त सीरियन प्रसारमाध्यमांनी दिलेत.

फ्रान्सचे राष्ट्रध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन सुरक्षित

एका निनावी सुरक्षा अधिकाऱ्याच्या हवाल्याने सरकारी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, राजधानीच्या मध्यवर्ती भागात झालेले दोन स्फोट स्फोटकांमुळे झाले होते. घटनास्थळावरून धुराचे लोट वर येताना दिसत होते. जीवितहानीबाबत कोणतीही तात्काळ माहित मिळाली नाहीये. यासह या स्फोटाची जबाबदारी कोणत्याही गटाने स्वीकारलेली नाही.

तुर्कीला जाण्यापूर्वी मॅक्रॉन सीरियाला गेले

अल-शारा सत्तेवर आल्यापासून सीरियाला भेट देणारे मॅक्रॉन हे पहिलेच प्रमुख पाश्चात्य नेते आहेत. ही भेट अंकारा (तुर्की) येथे होणाऱ्या 'नाटो' (NATO) शिखर परिषदेपूर्वी होत आहे. सीरियावर लादण्यात आलेले बहुतांश निर्बंध उठवण्यासाठी युरोप आणि अमेरिकेला राजी करण्यात मॅक्रॉन यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.

French President Macron:
भारतावरील मोठा अनर्थ टळला! दोन राज्यांमध्ये एटीएसची धाड, ८ दहशतवाद्यांना पकडले

मॅक्रॉन सोमवारी रात्री एका आर्थिक शिष्टमंडळासह देशात दाखल झाले. युद्धग्रस्त असलेल्या या देशात १४ वर्षांच्या संघर्षानंतर पुनर्बांधणीसाठी गुंतवणूकदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जातोय. ते आपल्या समकक्ष नेत्यासोबत सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com