मृतदेह सापडला नाही तरी आरोपी दोषी ठरू शकतो; हत्येच्या खटल्यात सुप्रीम कोर्टाचा महत्वपूर्ण निकाल

Supreme Court Ruling On Murder Without Dead Body India: मृतदेह सापडला नाही तरी आरोपी दोषी ठरू शकतो, असा सुप्रीम कोर्टाचा महत्वपूर्ण निर्णय. साक्षीदाराच्या जबाबावर आधारित आसाममधील खटल्यात जन्मठेपेची शिक्षा कायम.
Supreme Court of India delivers a landmark judgment stating that murder can be proven even without recovery of the victim’s body.
Supreme Court of India delivers a landmark judgment stating that murder can be proven even without recovery of the victim’s body.saam tv
Published On

मृतदेह सापडला नाही तरी आरोपी दोषीच आहे अशी महत्वपूर्ण टिप्पणी सुप्रीम कोर्टाने केली. जरी पीडितेचा मृतदेह हा शेवटपर्यंत सापडलाच नाही तरी देखील आरोपी हा निर्दोष सिद्ध होऊ शकत नाही असे कोर्टाने एका खटल्यादरम्यान म्हटले. बऱ्याच वेळा खून केल्यावर मृतदेह हा गायब करण्यात येतो किंवा नदीत फेकण्यात येतो जेणेकरून मृतदेह मिळू नये आणि गुन्हा केलाच नाही असे सिद्ध करता येईल. मात्र फक्त मृतदेह न सापडल्याने आरोपी कायद्याच्या कचाट्यातून सुटू शकत नाही असे कोर्टाने म्हटले.

हिंदुस्तान टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, न्यायमूर्ती संजय करोल आणि न्यायमूर्ती प्रसन्ना बी. वराळे यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. त्यांनी आसाममधील एका आरोपीला दिलेली जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवली. या प्रकरणात 10 वर्षांच्या दत्तक मुलीचा खून करून तिचा मृतदेह नदीत फेकल्याचा आरोप होता, मात्र मृतदेह अजूनपर्यंत सापडलाच नाही.

Supreme Court of India delivers a landmark judgment stating that murder can be proven even without recovery of the victim’s body.
CBSE 3 Language Policy: इयत्ता नववीत तिसरी भाषा शिकवावी की नाही? सीबीएसईच्या त्रिभाषा धोरणावर सुप्रीम कोर्टाने स्पष्ट सांगितलं

नेमके प्रकरण काय होते?

ही संपूर्ण घटना 2015 साली घडली आहे. आसाममधील देबोजीत पंकिकावर 10 वर्षाच्या मुलीचा हत्येचा आरोप होता. या लहान चिमुरडीला तिच्या मावशीने दत्तक घेतले होते. हे दोघेजण तिच्या आई आणि त्या आरोपीसोबत राहत होते. याच दरम्यान ही मुलगी अचानक गायब झाली. तपासादरम्यान समोर आले की या मुलीचा खून करून मृतदेह पोत्यात टाकून नदीमध्ये फेकून दिला. पोलिसांनी कसून तपास केल्यानंतर देखील हा मृतदेह आजपर्यंत सापडला नाही.

Supreme Court of India delivers a landmark judgment stating that murder can be proven even without recovery of the victim’s body.
Hydrogen Train: देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन आजपासून सुरू, कुठून -कुठपर्यंत धावणार, तिकिटाचा खर्च किती?

या संपूर्ण प्रकरणात एका साक्षीदाराची साक्ष सगळ्यात मोठा पुरावा ठरला. या साक्षीदाराने सांगितले की, आरोपीने मुलीवर चोरीचा आरोप करून तिला जाळले आणि नंतर चाकूच्या धाकावर त्याच्याकडून मृतदेह पोत्यात भरून सायकलवरून नदीकाठी नेण्यास भाग पाडले आणि त्यानंतर त्याने हा मृतदेह नदीत फेकून दिला. मात्र या साक्षीदाराने असा कुठलाही दावा केला नाही की, त्याने हा खून होताना बघितले. त्याने फक्त त्याच्यासोबत जे घडले ते सांगितले. न्यायालयाने साक्षीदाराच्या न्यायालयाने साक्षीदाराच्या जबाबावर विश्वास ठेवला. त्याने खून प्रत्यक्ष पाहिला नसल्याचे प्रामाणिकपणे सांगितल्याने त्याची विश्वासार्हता अधिक वाढते, असे न्यायालयाने नमूद केले.

या निर्णयामुळे मृतदेह लपवून किंवा गायब करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींची कायद्याच्या कचाट्यातून सुटका मिळणार नाही, असा स्पष्ट संदेश सुप्रीम कोर्टाने दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com