सोनम रघुवंशीला सुप्रीम कोर्टाचा दणका! जामीन रद्द, 3 आठवड्यात सरेंडर करण्याचा आदेश

Raja Raghuvanshi Killing Case: राजा रघुवंशी हात्याकांड प्रकरणी मुख्य आरोपी पत्नी सोनम रघुवंशीला सुप्रीम कोर्टानं दणका दिलाय. न्यायालायाने उच्च न्यायालयाने दिलेला जामीन रद्दा केलाय.
 Raja Raghuvanshi  Killing Case:
Supreme Court cancels Sonam Raghuvanshi bail in Raja Raghuvanshi murder casesaam tv
Published On

इंदौर येथील ट्रान्सपोर्ट व्यापारी राजा रघुवंशी यांची हनिमूनच्या वेळी हत्या झाली होती. या हत्याप्रकरणातील आरोपी पत्नी सोनमला सुप्रीम कोर्टानं दणका दिलाय. सर्वोच्च न्यायालयानं सोनम रघुवंशीचा जामीन रद्द केलाय. इतकेच नाही तर न्यायालयाने तिला पुढील ३ आठवड्यात सरेंडर होण्याचा आदेश दिलाय. जर सुनावणीसाठी विलंब झाला तर सहा महिन्यानंतर सोनमला रघुवंशी पुन्हा जामीन दिला जाईल असं सुप्रीम कोर्टानं म्हटलंय.

 Raja Raghuvanshi  Killing Case:
Kalyan Crime: मिंडा कंपनीत खळबळजनक घटना; २ सहकाऱ्यांनी केली वरिष्ठ कर्मचाऱ्याची हत्या, धक्कादायक कारण आलं समोर

आरोपी पत्नी सोनम रघुवंशी हिला मिळालेल्या जामिनाला आव्हान देणारी याचिका मेघालय सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. या सुनावणीदरम्यान सोनम रघुवंशी यांच्या वकिलांनी सांगितले की, या प्रकरणात एकूण ९४ साक्षीदारांचा उल्लेख करण्यात आला आहे. यातील आतापर्यंत केवळ चार साक्षीदारांचे जबाब नोंदवले गेले आहेत.

 Raja Raghuvanshi  Killing Case:
धक्कादायक! व्यापाऱ्याने पत्नी अन् २ मुलींची हत्या केली, त्यानंतर स्वतःही आयुष्य संपवलं

या प्रकरणात पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात आले असून, तिला कठोर अटींच्या अधीन राहून जामीन मंजूर करण्यात आला आहे. दरम्यान सोनमच्या वकिलांनी सांगितलं की, तिने शरणागती पत्करली नव्हती. तिला उत्तर प्रदेशातील गाझीपूर येथे अटक करण्यात आली होती, मात्र तिच्या अटकेचे चित्रण 'शरणागती' असे केले जातंय.

वकिलांनी पुढे सांगितले की, ती जामिनाच्या कठोर अटींचे पालन करत आहे आणि ती कुठे पळून जाईल असं नाहीये. मेघालय सरकारच्या वतीने बाजू मांडताना सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सांगितले की, अटकेसाठी दिलेली कारणे निराधार आहेत. आरोपीने स्वेच्छेने शरणागती पत्करली होती आणि ही बाब आरोपपत्रातही नमूद करण्यात आलीय.

मागील सुनावणीत काय घडलं होतं?

मागील सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने सोनमच्या वकिलांसमोर दोन पर्याय ठेवले. एकतर सोनम रघुवंशीने शरणागती पत्करावी, अन्यथा न्यायालय तिचा जामीन रद्द करण्याचा आदेश देईल. सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या उत्तरात,आरोपी सोनम रघुवंशीने आपण निर्दोष असल्याचा दावा केला. या प्रकरणात खोट्या आरोपांखाली गोवण्यात आले आहे आणि सरकारी पक्षाचा संपूर्ण खटला केवळ परिस्थितीजन्य पुराव्यांवर आधारित आहे. अशा परिस्थितीत, केवळ आरोपांच्या आधारे तिला दोषी ठरवता येणार नाही, असा युक्तिवाद तिच्या वकिलांनी केलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com