Over 1,000 Dead in Deadly Landslide
Over 1,000 Dead in Deadly LandslideSaam

भयंकर !मुसळधार पावसामुळे भूस्खलन; अख्खं गाव चिखलाखाली, १००० लोकांचा मृत्यू

Over 1,000 Dead in Deadly Landslide: सुदानच्या दारफूर भागात मुसळधार पावसानंतर भूस्खलन. संपूर्ण गाव उद्ध्वस्त, हजारो लोकांचा मृत्यू. मृतदेह बाहेर काढण्यासाठी मदतीचे आवाहन.
Published on
Summary
  • सुदानच्या दारफूर भागात मुसळधार पावसानंतर भूस्खलन.

  • संपूर्ण गाव उद्ध्वस्त, हजारो लोकांचा मृत्यू.

  • मृतदेह बाहेर काढण्यासाठी मदतीचे आवाहन.

  • युद्धग्रस्त सुदानमध्ये मानवी संकट अधिकच गंभीर.

जगात निसर्ग आपले भयंकर रूप दाखवत आहे. एकीकडे अफगाणिस्तानला भूकंपाचा तडाखा बसला आहे. तर, दुसरीकडे आफ्रिकन देशातील सुदानमधील परिस्थिती भयानक झाली आहे. सुदानमध्ये भूस्खलन झाले. यामुळे मोठ्या प्रमाणात जनजीवन विस्कळीत झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार,भूस्खलनामुळे किमान १००० लोकांचा मृत्यू झाला आहे.

सुदानमधील परिस्थिती खूपच भयानक झाली आहे. मुसळधार पावसामुळे भूस्खलन झाले. ३१ ऑगस्ट रोजी मुसळधार पाऊस पडला होता. संततधारेमुळे भूस्खलन झाले. यामुळे एक गाव पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे. संसार उघड्यावर पडलाय. तसेच अनेक लोक चिखलाखाली दबले गेले आहेत. दारफुर प्रदेशावर या गटाचे नियंत्रण आहे. या गटाने संयुक्त राष्ट्र आणि आतंरराष्ट्रीय मदत संस्थांकडून मदत मागितली आहे.

Over 1,000 Dead in Deadly Landslide
Beed: पोलीस दलात खळबळ! निलंबित पोलीस निरिक्षकानं आयुष्य संपवलं, घरात कुणीही नसताना उचललं टोकाचं पाऊल

या भूस्खलनात हजारो लोकांचा मृत्यू झाला. ज्यात पुरूष, महिला आणि मुले यांचा समावेश आहे. मृतदेह काढण्यासाठी संयुक्त राष्ट्र आणि आंतरराष्ट्रीय सहाय्यता एजेंसीला मदतीसाठी आवाहन केले आहे. सुदानमध्ये आधीच युद्ध सुरू आहे. तेथील लोक युद्धामुळे उद्भवलेल्या परिस्थितीशी झुंजत आहे. लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे.

Over 1,000 Dead in Deadly Landslide
मराठा आरक्षणाबात मोठी अपडेट; हैदराबाद गॅझेट लागू होणार, जरांगेंची मागणी मान्य?

सुदान आर्मी आणि रॅपिड सपोर्ट फोर्समध्ये युद्ध सुरू आहे. या युद्धामुळे दारफूर प्रदेश आधीच प्रभावित झाला आहेत. गेल्या २ वर्षांपासून युद्ध सुरू आहे. या युद्धापासून नुकसान टाळण्यासाठी लोकांनी मारा पर्वतीय भागात आश्रय घेतला आहे.

Over 1,000 Dead in Deadly Landslide
म्हाडाकडून बंपर लॉटरी! पुण्यातील प्राईम लोकेशनवर घरे मिळणार, १३ हजार घरांसाठी लॉटरी जाहीर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com