म्हाडाकडून बंपर लॉटरी! पुण्यातील प्राईम लोकेशनवर घरे मिळणार, १३ हजार घरांसाठी लॉटरी जाहीर

Pune Mhada Lottery: म्हाडाकडून पुण्यात 13 हजार 301 परवडणारी घरे उभारली जाणार. प्रकल्प रोहकल (८ हजार घरे) व नेरे (५,३०१ घरे) येथे होणार. पंतप्रधान आवास योजनेतर्गत गृहनिर्माण योजना राबवली जाणार.
Mhada Lottery news
Mhada LotterySaam tv
Published On
Summary
  • म्हाडाकडून पुण्यात 13 हजार 301 परवडणारी घरे उभारली जाणार

  • प्रकल्प रोहकल (८ हजार घरे) व नेरे (५,३०१ घरे) येथे होणार

  • पंतप्रधान आवास योजनेतर्गत गृहनिर्माण योजना राबवली जाणार

  • गरीब व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी घरे राखीव असणार

हक्काचं घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. मुंबई - पुण्यातील प्राईम लोकेशनवर घर घेण्यासाठी सामान्य व्यक्ती धडपडत असतो. परंतु, वाढत्या किंमतीमुळे अनेक अनेकांचे घर घेण्याचं स्वप्न भंग होतं. अनेक कुटुंबाचे स्वत:चे घर घेण्याचे स्वप्न अपुरे राहते. मात्र, आता महाराष्ट्र गृहनिर्माण मंडळ पुण्यात खिशाला परवडणारी घरे उपलब्ध करून देणार आहेत. त्यामुळे लवकरच पुण्यातील प्राईम लोकेशनवर घर घेण्याचं स्वप्न

मुंबईनंतर पुण्यातही म्हाडाच्या बंपर घरांची सोडत निघणार आहे. पुणे आणि पिंपरी - चिंचवडसारख्या शहरी भागांसोबतच पुणे जिल्ह्याच्या निमशहरी भागातही परवडणारी घरे उपलब्ध करून देण्यासाठी म्हाडा पुढे सरसावले आहे. केंद्र सरकारच्या पंतप्रधान आवास योजनाअंतर्गत पुणे जिल्ह्यात सुमारे ३५ हजार घरांचे उद्दीष्ट ठेवण्यात आले असून, त्यापैकी १३ हजार ३०१ म्हाडा उभारणार आहे.

Mhada Lottery news
पवार - ठाकरेंची माणसं, मराठा आंदोलकांना अन्नधान्य पुरवतात; सदावर्तेंचा गंभीर आरोप

खेडच्या रोहकल आणि मुळशी तालुक्यातील नेरे या दोन ठिकाणी जिल्हा प्रशासनाने मिळून सुमारे ५७ एकर सरकारी गायरान जमीन म्हाडाला सुपूर्द केली आहे. या जमिनीवर गृहनिर्माण प्रकल्प उभारले जाणार आहे.

रोहकल खेड तालुका - गट क्रमांक २२०मधील १५ हेक्टर ७६ गुंठे सरकारी जमीन आणि जिल्हा परिषदाच्या एनओसीनंतर मिळालेली १५ हेक्टर ४६ गुंठे हा जमीन म्हाडाच्या ताब्यात देण्यात आली आहे. या ठिकाणी सुमारे ८ हजार उभारली जाणार आहे.

Mhada Lottery news
Manoj Jarange: मराठा आरक्षणासाठी राज्य सरकार नवीन जीआर काढण्याच्या तयारीत?

नेरे (तालुका मुळशी) गट क्रमांक ११७ आणि ११८ मधील साडेसात हेक्टरहून अधिक जमीन मिळाली असून, ५ हजार ३०१घरे बांधली जाणार आहेत. मात्र, या प्रकल्पाविरोधात स्थानिक ग्रामपंचायतीने आक्षेप नोंदवला असून, त्यावर निर्णय प्रक्रियेचे पडसाद उमटले आहेत. एकूण १३ हजार ३०१ घरे टप्प्याटप्प्यानं तीन ते चार वर्षांत पूर्ण करण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे. मात्र, जमीन सुपूर्द झाल्यानंतर तीन वर्षांत वापर झाला नाही, तर ती जमीन परत घेण्याची अट जिल्हा प्रशासनाने घातली आहे.

Mhada Lottery news
'..त्यांचा गेम वाजवलाच म्हणून समजा' मंत्री चंद्रकांत पाटलांना थेट इशारा, जरांगे पाटील नेमकं काय म्हणाले?

पुणे विभागीय सभापती शिवाजीराव आढळराव यांनी सांगितले की, 'रोहकल आणि नेरे येथील प्रकल्पांतून साधारण १३ हजार घरे उभारली जातील. त्यातील काही घरे गरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी राखीव असतील', असं ते म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com