Earthquake : भूकंपाने हाहाकार, जमीन थरथरली; लोक घरातून बाहेर पळाले

myanmar Earthquake : म्यानमारमध्ये भूकंपाने हाहाकार माजला आहे. या भूकंपाचे हादरे भारतामधील काही भागात जाणवले.
Earthquake : भूकंपाने हाहाकार, जमीन थरथरली; लोक घरातून बाहेर पळाले
Published On
Summary

म्यानमारमध्ये ६.० रिश्टर स्केलचा जोरदार भूकंप झाला

भूकंपाचे केंद्र म्यानमारमधील सीटवे परिसरात होते

म्यानमारमधील भूकंपाचे हादरे कोलकाता आणि पश्चिम बंगालमध्ये जाणवले

Myanmar Earthquake : म्यानमार पुन्हा एकदा भूकंपाने हादरलं आहे. म्यानमारमध्ये भारतीय वेळेनुसार रात्री ९ वाजून ५ वाजता झालेल्या भूकंपाचे धक्के कोलकाता आणि पश्चिम बंगालच्या भागात जाणवले. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केल ६.० इतकी होती. भूकंपाचं केंद्र म्यानमारमधील सीटवेजवळ होतं. येनांगयांगच्या पश्चिमेतील ९५ किलोमीटर आणि बांगलादेशातील कॉक्स बाजारापासून अंदाजे २०० किलोमीटर अंतरावर असल्याची माहिती मिळत आहे.

कोलकात्यात रात्री अचानक झालेल्या भूकंपामुळे उंच इमारतीत राहत असलेल रहिवासी घाबरून मोकळ्या जागेत पळून गेले. या भूकंपाच्या घटनेत किती नुकसान आणि जीवितहानी झाल्याची कोणतीही अधिकृत माहिती हाती आलेली नाही. या सर्व घटनेवर प्रशासनाचं बारीक लक्ष आहे.

Earthquake : भूकंपाने हाहाकार, जमीन थरथरली; लोक घरातून बाहेर पळाले
अजितदादांच्या निधनानंतर माजी गृहमंत्र्यांच्या मनात शंकेचं काहूर; राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर केला मोठा गौप्यस्फोट

मागील आठवड्यात अनेक भूकंपाच्या घटना घडल्या आहेत. १५ जानेवारी ते ३ फेब्रुवारीदरम्यान अनेक देशांच्या शहरांना भूकंपाचे धक्के जाणवले. त्यामुळे या देशातील नागरिक दहशतीत होते.

Earthquake : भूकंपाने हाहाकार, जमीन थरथरली; लोक घरातून बाहेर पळाले
लाडकी बहीण योजनेचे ४५०० रुपये कोणाला मिळणार? नवीन अपडेट समोर

काश्मीरमध्ये भूकंपाचे धक्के

जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमध्ये २ फेब्रुवारी २०२६ रोजी ४.८ रिश्टर स्केलचा तीव्रतेचा भूकंप झाला होता. त्या भूकंपाचे केंद्रबिंदू बडगाम जिल्हा होता. या भूकंपाचे खोऱ्यात हादरे बसले. त्यामुळे लोक तातडीने घराबाहेर पडले. याआधी लेह प्रदेशात ५.७ रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप झाला होता.

Q

म्यानमारमध्ये भूकंप किती वाजता झाला ?

A

भारतीय वेळेनुसार रात्री ९ वाजून ५ वाजता म्यानमारमध्ये भूकंप झाल्याची माहिती हाती आली आहे.

Q

भारतात नेमके कुठे-कुठे धक्के जाणवले?

A

कोलकाता आणि पश्चिम बंगाल राज्यातील काही भागात भूकंपाचे धक्के जाणवले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com