New Delhi : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना १ लाख २२ हजार डॉलरचा दंड ठोठावण्यात आला होता. अडल्ट स्टार स्टॉर्मी डेनियलसंबंधित प्रकरणात हा दंड ठोठावला होता. या प्रकरणात ट्रम्प यांना अटक देखील करण्यात आली होती. सध्या या प्रकरणात ट्रम्प यांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. आता या प्रकरणाची मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणात अडल्ट स्टारने केलेल्या आरोपावरून घुमजाव केल्याचे समोर आले आहे. (Latest Marathi News)
या प्रकरणावर भाष्य करताना अडल्ट स्टार डेनियल म्हणाली, ट्रम्प हे तुरुंगात जाण्यास पात्र आहे असे मला वाटत नाही'. फॉक्स न्यूजशी संवाद साधताना डेनियलने भाष्य केलं. ४४ वर्षीय डेनियलने ९० मिनिटांच्या मुलाखतीत अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं.
अमेरिकेत 2016 मध्ये झालेल्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या काळात अडल्ट स्टारला पैसे देऊन शांत केल्याप्रकरणी डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर त्यांना काही दिवसांपूर्वी अटक करण्यात आली. अटकेनंतर डोनाल्ड ट्रम्प यांना कोर्टात हजर करण्यात आले. पण काही वेळातच त्यांची जामीनावर सुटका झाली.
ट्रम्प यांनी मी दोषी नसल्याची कबुली दिली होती. ट्रम्प यांनी या प्रकरणात त्यांच्यावर केलेले सर्वच्या सर्व 34 आरोप फेटाळून लावत ते चुकीचे असल्याचे सांगितले होते. तसेच ट्रम्प यांनी मी निर्दोष असून राजकीय षडयंत्राखाली गोवण्यात आल्याचा त्यांनी आरोप केला. डेनियलसोबत आपला कोणताही संबंध नसल्याचेही त्याने सांगितले आहे.
या प्रकरणावर भाष्य करताना, 'माझ्या काय म्हणायचे आहे, तुम्हाला माहिती आहे, माझ्याकडे लपवण्यासारखे काहीच नाही. मी खरं बोलत आहे, याबद्दल तुम्हाला माहिती आहे. या गोष्टी आता मला लाजवू शकत नसल्याचे तिने सांगितले'.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.