

स्पेन- मोरोक्कोच्या सीमेवरील तणाव वाढला
मोरोक्कोच्या हजारो नागरिकांची स्पेनमध्ये घुसखोरी
सेउटा शहरात हजारो स्थलांतरितांची घुसखोरी
गोंधळाच्या परिस्थितीत १८ जणांचा मृत्यू
स्पेन आणि मोरोक्को या दोन्ही देशांच्या सीमेवर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. स्पेनच्या शेजारी असलेल्या मोरोक्कोमधील हजारो बेकायदेशीर स्थलांतरितांनी जमिनीमार्गे आणि समुद्र मार्गाने जबरदस्तीने सीमा ओलांडून स्पेनमधील सेउटा शहरात प्रवेश केला आहे. त्यामुळे परिस्थिती चिघळली आहे. दोन्ही देशांमधील वाद टोकाला गेला असून रक्तरंजित थरार रंगला आहे. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून स्पॅनिश सरकारने सुरक्षा कायम ठेवण्यासाठी सेउटामध्ये सैन्य आणि अतिरिक्त पोलिस दल तैनात केले आहे. या तणावपूर्ण परिस्थितीमध्ये १८ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. या घटनेचे थराराक व्हिडीओ समोर आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, स्पेन आणि मोरोक्को यांच्या सीमेवर युद्धासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. चांगल्या आयुष्याच्या शोधात मोरोक्कोमधील हजारो नागरिक स्पेनच्या सेउटा या छोट्याशा शहरात बेकायदेशीरपणे घुसले आहेत. अनेकांनी समुद्र पोहून पार केला तर काहींनी सीमेवरील शहरात प्रवेश केला. या घुसखोरीचे अनेक व्हिडीओ समोर आले आहेत जे सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत
न्यूयॉर्क टाइम्सच्या वृत्तानुसार, या गोंधळाच्या परिस्थितीमध्ये आतापर्यंत १८ जणांचा मृत्यू झाला. परिस्थिती इतकी गंभीर झाली की, स्पॅनिश सरकारने सैन्य पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. रस्त्यांवरील गर्दी, समुद्रात तरंगणारे मृतदेह आणि सीमा सुरक्षेतील झालेली चूक यामुळे संपूर्ण युरोपमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दोन्ही देशांमधील तणाव वाढला आहे. सध्या याठिकाणी आणीबाणी सारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.
मोरोक्कोमधून स्पेनमध्ये घुसखोरी करणाऱ्यांमध्ये फक्त तरुण आणि पुरूष नाहीत तर महिला आणि लहान मुलांचा देखील समावेश आहे. स्पेनमध्ये घुसखोरी करणाऱ्यांचे प्रमाण वाढतच चालले आहे. त्यामुळे परिस्थिती गंभीर होत चालली आहे. या घुसखोरीमुळे सीमाव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. सेउटा शहरात सुरक्षा राखण्यासाठी सिव्हिल गार्डला मदत करण्याकरिता ते सैन्य पाठवत असल्याचे स्पॅनिश सरकारे सांगितले. सरकारने असेही जाहीर केले की, पंतप्रधान पेद्रो सांचेझ शुक्रवारी गृहमंत्री फर्नांदो ग्रांदे-मार्लास्का यांच्यासोबत सेउटाला भेट देतील.
सोशल मीडियावर सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये दिसत होते की, तराजल समुद्रकिनाऱ्यामार्गे मोठ्या संख्येने नागरिक ज्यामध्ये बहुतांशी मोरोक्कन नागरिक होते आणि ते स्थानिक रस्त्यांवर मोठ्या संख्येने येत होते. स्पेनमधील सेउटा प्रांतात हजारो तरुण घुसल्यानंतर स्पेनने आता आपले सैन्य तैनात केले आहे.
स्पेन आणि मोरोक्को यांच्या सीमेवर युद्धासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. स्थलांतरितांसाठी एक प्रमुख ठिकाण असलेल्या इटलीवरही या संकटाचा परिणाम झाला आहे. इटलीची स्पेनसोबत थेट सीमा नसली तरी, आपल्या नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी स्पेनसोबतचा शेंगेन खुला सीमा करार निलंबित केला जाऊ शकतो, असा इशारा इटलीचे पंतप्रधान जॉर्जियो मेलोनी यांनी दिला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.