'आणीबाणी लादणं ही इंदिरा गांधींची मोठी चूक'; सोनिया गांधींच्या आत्मचरित्रात धक्कादायक खुलासे

Sonia Gandhi New Book : काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधींचं 'बिलॉन्गिंग' हे पुस्तक नुकतचं प्रकाशित झालयं. मात्र या पुस्तकात सोनिया गांधींनी वैयक्तिक आयुष्याची आणि भारतातील 6 दशकांच्या प्रवासाची कहाणी मांडताना कोणते धक्कादायक खुलासे केलेत? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून.
Sonia Gandhi memoir reveals insights into six decades of Indian history
Sonia Gandhi memoir reveals insights into six decades of Indian historysaam tv
Published On: 
Summary
  • काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांचे 'Belonging' हे पुस्तक चर्चेत

  • या पुस्तकात सोनिया गांधी यांनी वैयक्तिक आयुष्याचा प्रवास

  • भारतातील जवळपास सहा दशकांच्या प्रवासाचा अनुभव

काँग्रेस पक्षाच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांचे बहुचर्चित आत्मचरित्र 'बिलॉन्गिंग: अ जर्नी ऑफ लव्ह' सध्या राजकीय वर्तुळात प्रचंड चर्चेत आलयं. या पुस्तकात सोनिया गांधींनी गांधी कुटुंबाच्या वैयक्तिक आयुष्यापासून ते भारतातील ६ दशकांच्या प्रवासाची कहाणी मांडली आहे..देशाच्या राजकारणातील अनेक मोठ्या घडामोडींवर त्यांनी मोकळेपणानं भाष्य केलयं.

1975 मध्ये लावलेली आणीबाणी ही इंदिरा गांधींची चूक होती, असं विधान सोनिया गांधींनी आत्मचरित्रात केलयं.

संजय गांधी यांना नियंत्रणात ठेवले असते तर आणीबाणीनंतरचे बरेच नुकसान टाळता आले असते, अशी सोनिया गांधींची भूमिका आहे.

राजीव गांधी आणीबाणीच्या निर्णयाच्या विरोधात होते, असंही सोनिया गांधींनी लिहलयं.

2004 साली यूपीएच्या विजयानंतर सोनिया गांधींनी पंतप्रधान पदासाठी नकार का दिला.. याबद्दल आत्मचरित्रात सोनिया गांधी म्हणतात.

आजी इंदिरा आणि वडील राजीव यांच्या हत्येनंतर आईलाही गमावण्याची भीती मुलांना वाटत होती.त्यामुळेच सोनिया गांधींनी पंतप्रधान पदाच्या आग्रहाला नकार

दरम्यान इंदिरा गांधींच्या हत्येनंतर प्रेमापोटी सोनिया गांधींनी राजीव गांधींना राजकारणात जाण्यापासून कसं रोखलं ऐका,

राजीव गांधींना राजकारणात येण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केल्याचे सोनिया गांधींनी पुस्तकात लिहलयं

इंदिरा गांधींच्या हत्येनंतर राजीव यांच्याबाबतही त्यांना भीती वाटत होती.

राजीव गांधी यांच्या हत्येनंतर कुटुंबावर झालेल्या परिणामांचे भावनिक वर्णन पुस्तकात आहे

राजीव गांधींच्या काही चुकांबद्दलही सोनिया गांधींनी या पुस्तकात लिहिलय एवढंच नाही तर पंतप्रधान मोदींसोबत वैयक्तिक पातळीवर प्रत्यक्ष संवाद कमी असला तरी काही मुद्द्यंवर विचारांचं साम्य असल्याचंही त्यांनी नमूद केलंय.

एकंदरित सोनिया गांधींच्या या आत्मचरित्राने एकाच वेळी गांधी कुटुंबाच्या वेदना, राजकीय संघर्षाचे अंतरंग आणि इतिहासातील काही वादग्रस्त प्रकरणांवर नवा प्रकाश टाकलाय...एकूणच 'बिलॉन्गिंग: अ जर्नी ऑफ लव्ह' मुळे देशाच्या राजकारणात नव्या चर्चेला सुरुवात झालीय. हे मात्र खरं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.