Shocking : लव्ह मॅरेजनंतर ४ महिन्यांनी जवानाच्या पत्नीने आयुष्य संपवलं; इन्स्टाग्रामवर पोस्ट केला शेवटचा व्हिडिओ

Uttar pradesh Shocking : उत्तर प्रदेशमध्ये जवानाच्या बायकोने आयुष्य संपवल्याची घटना घडली. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.
Uttar pradesh news
uttar pradesh Shocking Saam tv
Published On
Summary

उत्तर प्रदेशच्या लखनौत घडली भयंकर घटना

जवानाच्या पत्नीने घरात आयुष्य संपवलं

आयुष्य संपवण्याआधी सोशल मीडियावर पोस्ट

उत्तर प्रदेशच्या राजधानी लखनौमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. बख्शी तलावाजवळील पोलीस ठाण्यात ड्युटीवर असलेल्या जवानाच्या बायकोने आयुष्य संपवल्याची घटना घडली आहे. जवानाच्या बायकोने आयुष्य संपवण्याआधी इन्स्टाग्रामवर एक भावुक व्हिडिओ पोस्ट केला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

Uttar pradesh news
Mahashtra Politics : महायुतीत नाराजीनाट्य; माधुरी मिसाळांच्या बैठकीवर शिरसाटांची नाराजी, नेमकं काय घडलं? VIDEO

मिळालेल्या माहितीनुसार, सौम्या आणि जवान अनुराग सिंह यांचं ४ महिन्यापूर्वी प्रेम विवाह झाला. लग्नानंतर सौम्याला सासरच्या छळाला सामोरे जावं लागलं. अनुरागच्या कुटुंबीय हुंड्यावर अडून बसले होते. त्यामुळे सौम्याचा छळ सुरु होता.

Uttar pradesh news
Wardha Rain : पावसाने केली दैना! घर कोसळलं, कुटुंबावर शौचालयात राहण्याची वेळ

अनुराग देखील सौम्याला मारहाण करायचा. अनुरागचं पोलीस स्टेशनजवळ घर होतं. सौम्याच्या आत्महत्येनंतर खळबळ उडाली आहे. जवानाच्या बायकोने आयुष्य संपवण्याआधी इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला. या व्हिडिओमध्ये जवानाच्या बायकोने आयुष्य संपवण्याचं कारण सांगितलं. जवानाच्या पत्नीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आगे. या प्रकरणी पोलिसांनी पुढील तपास सुरु केला आहे.

Uttar pradesh news
Maharashtra Politics : धनंजय मुंडे पुन्हा मंत्रीपदी? अजित पवारांनी दिले संकेत, नेमकं काय म्हणाले? VIDEO

विद्यार्थ्याने आयुष्य संपवलं

दरम्यान, ग्रेटर नोएडाच्या एका खासगी विद्यापीठात विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घडली. हा विद्यार्थी बीडीएसच्या दृतीय वर्षात शिकत होता. विद्यार्थ्याने आयुष्य संपवण्याआधी एक चिठ्ठी लिहिली. या चिठ्ठीत शिक्षकाने छळ केल्याचा आरोप केला. विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याने विद्यापीठात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी प्रशासनाच्या विरोधात नाराजी व्यक्त केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com