Ajit Pawar On Dhananjay Munde
Ajit Pawar On Dhananjay Munde Saam Tv

Maharashtra Politics : धनंजय मुंडे पुन्हा मंत्रीपदी? अजित पवारांनी दिले संकेत, नेमकं काय म्हणाले? VIDEO

Ajit Pawar On Dhananjay Munde : धनंजय मुंडेंची पुन्हा एकदा मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे.. त्यावरुन राजकारण तापलंय...मात्र खरंच मुंडेंना मंत्रिपद मिळू शकतं का? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...
Published on

सरपंच संतोष देशमुखांच्या क्रूर हत्या प्रकरणात वाल्मिक कराडच मास्टरमाईंड असल्याचं समोर आलं. आणि धनंजय मुंडेंची मंत्रिमंडळातून विकेट पडली... मात्र आता खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवारांनीच धनंजय मुंडेंच्या मंत्रिमंडळातील कमबॅकचे संकेत दिलेत...

Ajit Pawar On Dhananjay Munde
Husband Wife Clash : बायको बॉयफ्रेंडसोबत हॉटेलमध्ये, अचानक नवऱ्याची एन्ट्री; पुढे काय घडलं? वाचा

कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंचा सभागृहात रमी खेळतानाचा व्हिडीओ समोर आल्यानंतर त्यांच्या मंत्रिपदावर टांगती तलवार आहे... तर दुसरीकडे उच्च न्यायालयाने कृषी घोटाळा प्रकरणी धनंजय मुंडेंना क्लीन चिट दिलीय.. त्यामुळे कोकाटेंचं मंत्रिपद मुंडेंना दिलं जाण्याची चर्चा आहे... मात्र देशमुख हत्या प्रकरण प्रलंबित असताना मुंडेंना मंत्रिमंडळात घेण्याची घाई का? असा सवाल राऊतांनी उपस्थित केलाय...

Ajit Pawar On Dhananjay Munde
Court Attack : कोर्टावर दहशतवादी हल्ला; 8 जणांचा मृत्यू, परिसरात खळबळ

तर कृषी घोटाळ्यासंदर्भात उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचं अंजली दमानियांनी जाहीर केलंय...

Ajit Pawar On Dhananjay Munde
Wardha Accident : वर्ध्यात भीषण अपघाताचा थरार; बस आणि ट्रेलरची धडक, वाहनांचा चक्काचूर

धनंजय मुंडेंना कृषी घोटाळा प्रकरणी क्लिन चीट मिळाली असली तरी संतोष देशमुख हत्या प्रकरण कोर्टात प्रलंबित आहे... त्यामुळे संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निर्णय येण्याआधीच अजित पवार धनंजय मुंडेंना मंत्रिपद देणार का? आणि माणिकराव कोकाटेंचं कृषीमंत्रिपद धनंजय मुंडेंना दिलं जाणार का? याकडे राज्यातील जनतेचं लक्ष लागलंय...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com