Mahashtra Politics : महायुतीत नाराजीनाट्य; माधुरी मिसाळांच्या बैठकीवर शिरसाटांची नाराजी, नेमकं काय घडलं? VIDEO

sanjay shirsat and madhuri misal news : महायुतीत ऑल इज वेल असल्याचा दावा करण्यात येत असताना मंत्री संजय शिरसाट आणि मंत्री माधुरी मिसाळ यांच्यात वादाची ठिणगी पडलीय... मात्र वादाचं नेमकं कारण काय आहे? पाहूयात.....
sanjay shirsat news
sanjay shirsat and madhuri misal clash Saam tv
Published On

महायुतीच्या 8 वादग्रस्त मंत्र्यांची विकेट जाणार असल्याची चर्चा असतानाच आता महायुतीच्या मंत्र्यांमध्ये मानापमान नाट्य रंगलंय... सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी अधिकाऱ्यांसोबत घेतलेल्या बैठकीवर आक्षेप घेत मंत्री संजय शिरसाट यांनी खरमरीत पत्र लिहिलं आणि महायुतीच्या मंत्र्यांमधील वाद चव्हाट्यावर आलाय...

मिसाळांना शिरसाटांचं खरमरीत पत्र

बैठक घ्यायची झाल्यास माझ्या अध्यक्षतेखाली घ्यावी

अधिकारी-कर्मचाऱ्यांना विविध निर्देश देत आहात

योग्य समन्वयासाठी काही विषय वाटप करण्यात आलेत

इतर विषयांबाबत बैठकीसाठी माझी परवानगी आवश्यक

sanjay shirsat news
Beed Shocking : तरुण डॉक्टरची इंजेक्शन घेऊन आत्महत्या; बीडमध्ये खळबळ

तर मंत्री संजय शिरसाट यांच्या पत्रानंतर मंत्री माधुरी मिसाळ यांनी आश्चर्य व्यक्त करत मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसारच काम करत असल्याचं स्पष्ट केलंय...

दुसरीकडे महायुतीतील मंत्रीच आमने-सामने आल्याने विरोधकांच्या हाती आयतं कोलित मिळालंय... संजय राऊतांनी शिरसाट यांना गाशा गुंडाळण्याचा सल्ला दिलाय.

sanjay shirsat news
Wardha Rain : पावसाने केली दैना! घर कोसळलं, कुटुंबावर शौचालयात राहण्याची वेळ

पत्र जाहीर झाल्यानंतर मात्र शिरसाटांनी माधुरी मिसाळ आणि आपल्यात कुठलाही वाद नसल्याचं म्हटलंय. केवळ संजय शिरसाट आणि माधुरी मिसाळच नाही तर अनेक मंत्र्यांमध्ये वादाच्या फैरी झडत असल्याचं समोर आलंय..

सामाजिक न्याय विभागाचा निधी लाडकीसाठी वळवल्याने शिरसाट यांची अजित पवारांवर नाराजी

रायगडच्या पालकमंत्रिपदावरुन भरत गोगावले विरुद्ध आदिती तटकरे यांच्यात वाद

नाशिकच्या वर्चस्वाच्या लढाईतून दादा भुसे विरुद्ध गिरीश महाजन यांच्यात संघर्ष

sanjay shirsat news
Politics : पंतप्रधान नरेंद्र मोदी विष्णूचे ११वे अवतार; कुणी केलं विधान? वाचा

एवढंच नाही तर कंत्राटदार हर्षल पाटीलने आत्महत्या केल्यानंतर तो शासकीय कंत्राटदार नसल्याचं पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटलं होतं... त्यावरुन भाजप आमदार सदाभाऊ खोत यांनी गुलाबराव पाटलांच्या राजीनाम्याची मागणी केलीय...आता महायुतीच्या मंत्र्यांमधील वाद चव्हाट्यावर आल्याने सरकारची प्रतिमा डागाळण्याची शक्यता आहे.. त्यामुळे मुख्यमंत्री मंत्र्यांची कानउघडणी करणार की थेट नारळ देऊन मंत्रिमंडळात फेरबदल करणार? याकडे राज्याचं लक्ष लागलंय..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com