Maharashtra Politics : माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद राहणार की जाणार? साडेसाती टाळण्यासाठी कृषीमंत्री शनिचरणी?

Manikrao Kokate : सभागृहात रमी खेळणं आता कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंना भोवण्याची शक्यता आहे... त्यामुळे कोकाटेंनी साडेसाती टाळण्यासाठी थेट शनिचरणी लोटांगन घातलंय... त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट....
Manikrao Kokate
Manikrao KokateSaam Tv
Published On

Manikrao Kokate News : रमी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने संकटात सापडलेल्या कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंनी आता थेट शनिदेवाच्या चरणी धाव घेतलीय...कोकाटेंनी नंदूरबार जिल्ह्यातील शनिमांडळच्या शनिमंदिरात शनिदेवाची पूजा करत संकट दूर करण्यासाठी साकडं घातलंय...

सभागृहात रमी खेळतानाचा व्हिडीओ आणि त्यानंतर सरकारविषयी केलेलं वादग्रस्त वक्तव्यामुळे कोकाटेंच्या राजीनाम्याच्या मागणीने जोर धरलाय.. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनीही कोकाटेंच्या कृत्याबद्दल नाराजी व्यक्त केलीय.. तर अजित पवारांनी कोकाटेंच्या राजीनाम्यासंदर्भात सूचक वक्तव्य केलंय...

Manikrao Kokate
Pune Crime : पुण्यात भयंकर घडलं! जेवणासाठी घरी बोलवलं, दारू पाजली; किरकोळ वादातून तरुणाची दगडाने ठेचून हत्या

महायुतीच्या सत्ता स्थापनेपासून कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंनी वादग्रस्त वक्तव्यांची मालिकाच सुरु केलीय.. आतापर्यंत कोणती वादग्रस्त वक्तव्य केली आहेत? पाहूयात...

  • 'भिकारीसुद्धा 1 रुपया घेत नाही'

  • 'कर्जमाफीच्या पैशांचा लग्नांसाठी वापर'

  • 'ढेकळाचे पंचनामे करायचे का?'

  • 'भिकारी शेतकरी नाही सरकार'

Manikrao Kokate
Jasprit Bumrah Retirement : टीम इंडियाला मोठा हादरा! जसप्रीत बुमराह कसोटीतून निवृत्ती घेणार?

वादग्रस्त मंत्र्यांमुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीला फटका बसण्याची शक्यता असल्याने 8 मंत्र्यांची विकेट जाणार असल्याची चर्चा आहे.. या यादीत माणिकराव कोकाटेंचं नाव टॉपला असल्याचं म्हटलं जातंय.. मंगळवारी अजित पवारांसोबतच्या बैठकीनंतर कोकाटेंची गच्छंती होण्याऐवजी खातेबदल होणार का? शनिदेव कृषीमंत्री कोकाटेंवर कोपणार की पावणार का? याचीच चर्चा रंगलीय...

Manikrao Kokate
Nashik Honey Trap : नाशिक हनी ट्रॅप प्रकरणाची व्याप्ती वाढली; ७२ वरिष्ठ अधिकाऱ्यांसह डॉक्टर्स, व्यावसायिक अडकले

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com