

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे पती परकला प्रभाकर आंदोलनात सहभागी होणार
अभिजित दीपके, प्रकाश राज, नेहा बोरा आणि राकेश टिकैतही आंदोलनात सहभागी होणार
विरोधकांकडून मतदारांची नावे वगळली जाण्याबाबत चिंता व्यक्त केली जातेय.
देशात होत असलेल्या SIR प्रक्रियेवरून आरोप-प्रत्यारोप होतातय. मतदारांचे नाव हटवली जात असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातोय. पण विरोधी पक्ष जाणूनबुजून विरोध करत आहे. जेणेकरून बनवाट नावे मतदार याद्यांमध्ये ठेवता यावीत, असा आरोप सत्ताधारी नेते करत आहेत. या आरोपासह एसआयआर किती महत्त्वाचा आहे, हे सत्ताधारी पटवून देत आहेत. मात्र त्याचदरम्यान अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या पतीने एसआयआरबाबत केलेल्या विधानावरून मोदी सरकारची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.
त्याचं झालं असं, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे पती पराकला प्रभाकर हे उद्या म्हणजेच २३ ऑक्टोबर २०२६ रोजी देशव्यापी आंदोलनात सहभागी होणार आहेत. या हे आंदोलन मतदार याद्यांच्या 'विशेष सखोल पुनरीक्षण' (Special Intensive Revision - SIR) प्रक्रियेच्या विरोधात केले जाणार आहे. या आंदोलनात प्रभाकर यांच्यासोबत 'कॉक्रोच जनता पार्टी'चे संस्थापक अभिजित दीपके, अभिनेते प्रकाश राज, AISA च्या अध्यक्षा नेहा बोरा आणि शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्यासह अनेक मान्यवर व्यक्ती एकाच मंचावर उपस्थित राहणार आहेत.
हे आंदोलन 'पीपल अगेन्स्ट एसआयआर' नावाने केलं जाणार आहे. या आंदोलनाचा उद्देश 'एसआयआर' (SIR) प्रक्रिया पूर्णपणे बंद करण्यात यावी अशी मगाणी केली जातेय. यासह ते मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाणार आहे. आयोजकांचा असा आरोप आहे की, 'एसआयआर' प्रक्रियेमुळे अनेक पात्र मतदारांची नावे मतदार यादीतून वगळली जाऊ शकतात, ज्यामुळे त्यांना मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहावे लागेल.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स' वरील एका पोस्टमध्ये प्रभाकर यांनी लिहिले की, "प्रत्येक गल्लीत एक 'जंतर-मंतर'! शुक्रवार, २३ ऑक्टोबर, २०२६. लोकशाही पुनर्स्थापित करण्यासाठी जनमोर्चा आयोजित करण्यात आलाय. चला, या आव्हानाचा सामना करूया." त्यांनी लोकशाही वाचवण्यासाठी नागरिकांना रस्त्यावर उतरण्याचे आवाहन केलंय. या आंदोलनात सहभागी होण्यासाठी विरोधी पक्षांच्या नेत्यांनाही निमंत्रित करण्यात आलंय.
आयोजकांनी आंदोलनात सहभागी होणाऱ्या लोकांनी आपल्या हातात तिरंगा झेंडा आणावा, प्रत्येक गल्लीत जंतरमंतर" अशा घोषणांचे फलक आणावेत, असे आवाहन करण्यात येत आहे.लोकांना आपापल्या परिसरात जंतरमंतरसारखे वातावरण निर्माण करण्याचे आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी आवाज उठवण्याचे आवाहन केलंय.
प्रभाकर यांनी याआधीही एसआयआरच्या विरोधात आपली मते मांडली आहेत. ८ ऑक्टोबर रोजी त्यांनी बेंगळुरूच्या फ्रीडम पार्क येथे 'सीजेपी' (CJP) द्वारे आयोजित निदर्शनांमध्ये सहभाग घेतला होता. या कार्यक्रमाला युट्युबर ध्रुव राठी आणि अभिनेते प्रकाश राज हे देखील उपस्थित होते. तिथे बोलताना प्रभाकर यांनी एसआयआरचे वर्णन "एक राजकीय हत्याकांड" असे केलं होतंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.