

सौरव दास आणि आशुतोष रांका यांना आठ दिवसांनंतर जामीन मंजूर.
पोलिसांच्या कोठडी वाढवण्याच्या मागणीवर न्यायालयाचा नकार
पक्षाच्या दोन नेत्यांना जामीन मिळाल्याने या प्रकरणाची चर्चा सुरू
कॉक्रोच जनता पार्टी' (CJP) चे नेते सौरव दास आणि आशुतोष रांका यांना आठ दिवसानंतर जामीन मंजूर करण्यात आलाय. दिल्ली पोलिसांनी त्यांची कोठडी आणखी तीन दिवसांनी वाढवण्यात यावी अशी विनंती न्यायायलयाकडे केली होती. परंतु न्यायालयाने ती फेटाळून लावलीय. दोन्ही नेते आठ दिवसांपासून न्यायालयीन कोठडीत होते. सौरव दास आणि आशुतोष रांका यांची न्यायालयीन कोठडी आज संपत होती, त्याामुळे या दोघांनाही सुनावणीसाठी एसईएम (SEM) न्यायालयात हजर करण्यात आले होते.
न्यायालयीन कोठडीत अलीकडेच वाढ करण्यात आल्यानंतर, सौरव दास आणि आशुतोष रांका यांनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती. आज न्यायालयात त्यांच्या याचिकांवर सुनावणी झाली. उच्च न्यायालयाने या दोन्ही 'सीजेपी' (CJP) कार्यकर्त्यांना फटकारले आणि प्रश्न उपस्थित केला की, जेव्हा हे प्रकरण अद्याप दंडाधिकारी न्यायालयात प्रलंबित आहे, तेव्हा त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका का दाखल केली? सुनावणीनंतर, दोन्ही कार्यकर्त्यांनी आपापल्या याचिका मागे घेतल्या.
न्यायालयाने सौरव दास आणि अशुतोष रांका यांच्या कोठडीत दोन दिवसाची वाढ केली होती. न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आल्यानंतर दोन्ही नेत्यांनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती. आज न्यायालयात त्यांच्या याचिकांवर सुनावणी झाली. उच्च न्यायालयाने या दोन्ही 'सीजेपी' कार्यकर्त्यांना फटकारले. हे प्रकरण अद्याप दंडाधिकारी न्यायालयात प्रलंबित आहे, तेव्हा त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका का दाखल केली? असा थेट सवाल न्यायालयानं त्यांच्या वकिलांना केला.
न्यायालयाने फटकारल्यानंतर दोन्ही कार्यकर्त्यांनी आपापल्या याचिका मागे घेतल्या आहेत. आदेशात नमूद केल्यानुसार, वैयक्तिक जातमुचलक्यावर (पर्सनल बाँड) त्याची सुटका करण्याची अट स्वीकारण्यात आलीय. जर इतर कोणत्याही प्रकरणात त्याची कोठडी आवश्यक नसेल, तर त्याला तिहार जेलमधून मुक्त केले जाण्याची शक्यता आहे.
सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाने उच्च न्यायालयात दाद मागण्यावरून दोन्ही नेत्यांना फटकारलं. त्यांना प्रश्न उपस्थित केला की, कायद्यात अपीलाची आणि इतर पर्यायी उपाययोजनांची तरतूद असताना याचिकाकर्त्यांनी थेट राज्यघटनेच्या कलम २२६ अंतर्गत न्यायालयाकडे दाद का मागितली? यासह न्यायालयाने बंधपत्राच्या (बॉन्ड) अटींचे उल्लंघन, जामीनदारांची (स्योरिटीज) नामंजूरी आणि दंडाधिकाऱ्यांच्या अधिकारांची व्याप्ती यांसारख्या कायदेशीर बाबींवरही प्रश्न उपस्थित केले.
सुनावणीदरम्यान न्यायालयाने दोन्ही व्यक्तींना त्यांचे वय विचारले. त्यांच्या वकिलांनी सौरव दासचे वय २७ वर्षे आणि आशुतोष रांकाचे वय ३१ वर्षे असल्याचे सांगितल्यावर न्यायालयाने स्पष्टपणे नमूद केलं की ते 'जनरेशन झेड' मध्ये येत नाहीत. 'मिलेनियल्स' या पिढीची वयोमर्यादा काय असते? असा सवालही न्यायालयाने केला. आधीच्या आंदोलनात लहान मुलांचाही सहभाग होता मात्र, त्यानंतर संघटनेची परिस्थिती बदलली आहे. संघटनेचे नेते तेच असले तरी संघटनेचा मूळ मुद्दा आता बदलला आहे, असं निरीक्षण न्यायालयाने नोंदवलंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.