उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यात धक्कादायक घटना
पोलीस ठाण्याच्या आवारात १९ वर्षीय तरुणीची हत्या
प्रियकरासोबत राहण्याची इच्छा व्यक्त केल्यामुळे वडिलांनी केली हत्या
तरुणीचा उपचाराआधीच मृत्यू झाला.
आरोपी वडिलांना पोलिसांनी तत्काळ अटक केली
Up Father Murder Daughter Inside Police Station उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यात शुक्रवारी घडलेल्या एक धक्कादायक घटना घडली आहे. पोलीस ठाण्याच्या आवारातच बापाने आपल्या १९ वर्षीय मुलीवर चाकूने हल्ला करून तिची हत्या केली. विशेष म्हणजे ही घटना पोलिसांच्या उपस्थितीत आणि पोलीस ठाण्याच्या सुरक्षित परिसरात घडल्याने कायदा-सुव्यवस्थेबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बांदा जिल्ह्यातील बरचा गावातील रहिवासी सत्य कुमार चौहान यांनी 18 मे रोजी बडौसा पोलीस ठाण्यात मुलीच्या अपहरणाची तक्रार दाखल केली होती. त्यांच्या मुलीला शेजारच्या एका तरुणाने पळवून नेल्याचा आरोप त्यांनी केला होता. तक्रारीनंतर पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून मुलीचा शोध सुरू केला. शुक्रवारी पोलिसांना संबंधित तरुणी सुखरूप सापडली. त्यानंतर तिला पुढील प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पोलीस ठाण्यात आणण्यात आले. मुलीला तिच्या कुटुंबाच्या ताब्यात देण्यापूर्वी तिच्या आई-वडिलांनाही पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले होते.
त्यानंतर मुलीच्या आई वडिलांनी तिला घरी येण्याचा आग्रह केला. मात्र, तरुणीने आपल्या बॉयफ्रेंडसोबत राहण्याची इच्छा व्यक्त केली. याच मुद्द्यावरून मुलीचे आई वडील भडकले. तिला समजावत असतानाच मुलीच्या वडिलांनी अचानक धारदार चाकू काढून तिच्या पोटात वार केला. या हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी झाली. पोलिसांनी तिला तातडीने वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. घटनेनंतर पोलीस ठाण्यात एकच खळबळ उडाली.
मृत तरुणीच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी वडिलांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून त्याला तात्काळ अटक करण्यात आली आहे. हल्ल्यासाठी वापरण्यात आलेला चाकूही जप्त करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक पलाश बन्सल यांनी सांगितले की, या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.