भयानक! एका दिवसात दोनदा बलात्कार! बॉयफ्रेंडनं आधी अब्रु लुटली, मग मित्राने लचके तोडले अन् चौथ्या मजल्यावरून फेकलं

Crime News : जगतसिंहपूर जिल्ह्यातील धक्कादायक प्रकरणात २३ वर्षीय महिलेवर अत्याचार करून तिचा मृत्यू झाल्याने दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिसांकडून अपहरण, अत्याचार आणि हत्येप्रकरणी तपास सुरू आहे.
Jagatsinghpur assault and murder case details
Rape CaseSaam TV
Published On

Jagatsinghpur assault and murder case details : ओडिशाच्या जगतसिंहपूर जिल्ह्यात एक लाजिरवाणी घटन घडली आहे. २३ वर्षीय महिलेवर एका दिवसात दोन वेळा बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बॉयफ्रेंडने २३ वर्षाच्या मुलीवर आधी बलात्कार केला, त्याच दिवशी मदत करण्याच्या बहाण्याने ओळखीच्या मित्रांनीही अब्रुचे लचके तोडले. नराधम इतक्यावरच थांबले नाहीत तर त्या पीडितेला चौथ्या मजल्यावरून खाली फेकून दिले. मुलीचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणी दोन आरोपींना अटक केली आहे. अपहरण, बलात्कार आणि हत्येप्रकरणात विविध कलमांखाली पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टाइम्स ऑफ इंडियाने पोलिसांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, त्या मुलीचा आरोपी बॉयफ्रेंड ३१ वर्षांचा आहे, तर दुसरा आरोपी २४ वर्षीय असून झारखंडमधील धनबाद येथील आहे. पारादीपमधील एका खासगी कंपनीत तो कामाला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार २३ वर्षाची महिला बॉयफ्रेंडसोबत तिर्तोल येथील एका मंदिरात रविवारी सकाळी गेली होती. त्या ठिकाणी दोघांचे लग्न होणार होते, पण तिने विश्वासघात केला. त्याने तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर मारहाण करून बस स्टॉपवर सोडले अन् पळ काढला.

Jagatsinghpur assault and murder case details
Shikhar Bank Scam : अजित पवार, सुनेत्रा पवारांना शिखर बँक घोटाळा प्रकरणी क्लीन चिट, रोहित पवारांनाही दिलासा

त्याच दिवशी संध्याकाळी झारखंडमधील आरोपीने तिची इज्जत लुटली. दारूच्या नशेत असलेल्या नराधमाने ओळखीचा फायदा घेत तिला लिफ्ट दिली. मुलगी विश्वास ठेवून त्याच्यासोबत दुचाकीवर गेली. पण त्याने तिला भाड्याच्या घरात नेले अन् बलात्कार केला. त्या महिलेने त्या नराधमाला पोलिसांत जायची धमकी दिली. त्यानंतर संतापलेल्या त्या व्यक्तीने तिला चौथ्या मजल्यावरून खाली ढकलून दिले. खाली मुलगी दगडावर पडल्याने डोक्याला गंभीर दुखापत झाली अन् जागेवरच मृत्यू झाला.

Jagatsinghpur assault and murder case details
Chembur Accident : मुंबईत भंयकर दुर्घटना, ८ व्या मजल्यावरून ६ कामगार पडले

दुसऱ्या दिवशी महिलेचा मृतदेह इमारतीच्या मागील बाजूला आढळला. त्यावर अनेक जखमांच्या खुणा होत्या. त्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिक पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली. पोलिसांनी महिलेचा मृतदेह ताब्यात घेतला अन् पोस्टमार्टमसाठी पाठवला. मृत महिलेच्या भावाने रविवारी रात्री ती बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. एका अनोळखी महिलेचा मृतदेह सापडल्याची माहिती मिळताच कुटुंबीय घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी तिची ओळख पटवली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तपास केला. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर हे पोलिसांनी आरोपींचा शोध घेतला. पोलिसांनी दोन्ही आरोपीला ताब्यात घेतले असून तपास करण्यात येत आहे.

Jagatsinghpur assault and murder case details
T20 World Cup: भारत-पाकिस्तान फायनलमध्ये भिडणार? 'या' एका समीकरणामुळे कट्टर प्रतिस्पर्धी पुन्हा आमनेसामने

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com