ATM gas cutter robbery : बँकेचे एटीएम लुटण्यासाठी चोरांनी अशी काही शक्कल लढवली आहे की पोलीसही चक्रावून गेले आहेत. रात्रीच्या अंधारात तोंडाला मास्क आणि अंगावर चक्क 'नाईटी' (Nighty) घालून ३ चोर आले. त्यांनी अवघ्या काही मिनिटांत एटीएम मशीन फोडले आणि तब्बल २५ लाख रुपयांची रोकड लंपास केले. चोरांचा हा विचित्र प्रकार सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यात कैद झाला. या भामट्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी आता ठिकठिकाणी पथके रवाना केली आहेत.
तेलंगणातील गांधारी मंडल मुख्यालयात रविवारी पहाटे एटीएम चोरीची ही घटना घडली. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) एटीएममध्ये घुसून ३ चोरट्यांनी २५ लाख रुपयांची रोकड लंपास केली. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी पहाटे १ वाजेच्या आसपास ३ अज्ञात चोरटे गाडीतून एटीएमजवळ आले. पकडले जाऊ नये म्हणून त्यांनी अंगात चक्क 'नाईटी' आणि तोंडाला मास्क घातला होता.
३ चोरांपैकी एकाने बाहेर पहारा दिला, तर उर्वरित दोघांनी आत शिरून गॅस कटरच्या साहाय्याने एटीएम मशीन कापले. अवघ्या काही वेळातच मशीनमधील सर्व रोख रक्कम घेऊन ते पसार झाले. चोरी झालेली नेमकी रक्कम किती, याचा अधिकृत आकडा अद्याप समोर आला नाही. पण २५ लाख रुपये चोरीला गेल्याचा पोलिसांना प्राथमिक अंदाज आहे. सध्या पोलीस परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) फुटेजच्या आधारे या चोरांचा शोध घेत आहेत.
सकाळी स्थानिकांना एटीएम फोडल्याचे लक्षात आल्यानंतर एकच खळबळ उडाली. गावकऱ्यांनी लगेच पोलिसांना माहिती दिली. चोरांचा माग काढण्यासाठी पोलीस आजूबाजूच्या सीसीटीव्ही फुटेजची कसून तपासणी करत आहेत. कॅमेऱ्यात नाईटी घातलेले दोन जण एटीएम कापून पैशांची बॅग घेऊन पळताना दिसत आहेत, पण ते नेमके कोण आहेत हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
गांधारी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक एम. महेंद्र यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी एटीएममध्ये ३० लाख रुपये भरण्यात आले होते. त्यानंतर शनिवारी मध्यरात्रीपर्यंत ग्राहकांनी ५ लाख रुपये काढले असतील, त्यामुळे मशीनमध्ये २५ लाख रुपये शिल्लक होते. याच रकमेवर चोरांनी डल्ला मारला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.