मोठी बातमी! दिल्लीतील जंतरमंतर आता आंदोलनासाठी बंद; ३ नवीन ठिकाणं जाहीर, भाजप सरकारचा निर्णय

Ramlila Maidan, Burari Ground and CBD Ground as New Protest Locations : दिल्लीतील आंदोलनांच्या ठिकाणांबाबत मोठा बदल झाल्याची माहिती समोर आली आहे. रामलीला मैदान, बुराडी मैदान आणि पूर्व दिल्लीतील सीबीडी ग्राउंड ही तीन पर्यायी ठिकाणे निश्चित केल्याचे वृत्त आहे.
Jantar-Mantar: जंतर-मंतर आंदोलनासाठी नाही
Jantar-Mantar ProtestSaam Tv News
Published On: 

jantar Mantar protest venue latest update : दिल्लीमध्ये आंदोलने आणि निदर्शने करण्यासाठी आता 'जंतरमंतर' हे ठिकाण अधिकृतरीत्या रद्द करण्यात आले आहे. नागरिकांच्या आंदोलनासाठी योग्य आणि पर्यायी जागा ठरवण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाने एका समितीची स्थापना केली होती. त्या शिफारशीनुसार दिल्ली पोलिसांनी हा मोठा निर्णय घेतला आहे.

(Ramlila Maidan, Burari Ground and CBD Ground as New Protest Locations)

सरकारच्या या नवीन बदलामुळे आता जंतर मंतरऐवजी रामलीला मैदान, बुराडी मैदान आणि पूर्व दिल्लीतील सीबीआय ग्राउंड (CBD Ground) ही तीन नवीन ठिकाणे आंदोलने करण्यासाठी अधिकृतपणे निश्चित करण्यात आली आहेत. तसेच, या तिन्ही ठिकाणांवर आंदोलने आयोजित करण्यासाठी लवकरच सविस्तर आणि सुधारित नियमावली (SOP) जारी केली जाणार आहे.

Jantar-Mantar: जंतर-मंतर आंदोलनासाठी नाही
ज्ञानेश कुमारांना सोडणार नाही! सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करणार; राहुल गांधींचा सर्वात मोठा निर्णय

दिल्लीतील जंतर मंतरवर यापुढे आंदोलन होणार नाही. कारण केंद्रीय गृह मंत्रालयाने आणि दिल्ली पोलिसांनी हे ठिकाण आंदोलनासाठी रद्द करण्यात आले आहे. दिल्ली पोलिसांचे २८ एप्रिल २०२२ रोजीचे जुने आदेश अंशतः बदलून हा नवीन आदेश दिल्लीचे पोलीस आयुक्त अनुराग कुमार यांनी जारी केला आहे.

Jantar-Mantar: जंतर-मंतर आंदोलनासाठी नाही
धक्कादायक! भाजपच्या माजी आमदाराला लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण करत संपवलं; नक्की काय घडलं?

आंदोलने किंवा निदर्शने करण्यासाठी सरकारकडून ३ नव्या ठिकाणांची यादी जारी करण्यात आली आहे. रामलीला मैदान, बुराडी मैदान आणि पूर्व दिल्लीतील सीबीजी या तीन नवीन ठिकाणी आंदोलने कशी करावीत, याबाबतची सविस्तर आणि सुधारित नियमावली (SOP) लवकरच स्वतंत्रपणे जारी केली जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com