Rahul Gandhi, Gyanesh Kumar, Supreme Court Petition : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात इंडिया आघाडी आक्रमक झाली आहे. या प्रकरणी थेट सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत याबाबतची माहिती दिली. ज्ञानेश कुमारांसारख्या चोराला का वाचवताय? असा थेट सवाल राहुल गांधी यांनी मोदींना विचारला. त्याशिवाय आंदोलक महिलांना आरएसएस आणि भाजपचे गुंड मारहाण करत असल्याचा आरोपही यावेळी राहुल गांधी यांनी केला.
सरन्यायाधीशांनी भेट नाकारल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दिली. आम्ही सुप्रीम कोर्टापर्यंत मार्च काढत याचिका दाखल करणार आहोत. तुम्ही आम्हाला किती दिवस अडवणार? आम्ही थांबणार नाही. जितके दिवस लागतील लागोत, पण ज्ञानेश कुमार यांच्यासारख्या चोराला का वाचवले जात आहे? असा थेट सवाल राहुल गांधी यांनी उपस्थित केला. ज्ञानेश कुमारांना आम्ही अजिबात सोडणार नाही, ते वाचणार नाहीत असा इशाराही यावेळी राहुल गांधी यांनी दिला.
मोर्चा काढण्यापूर्वी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी मोदी सरकार आणि आरएसएसवर गंभीर आरोप केले. लोकशाही वाचवण्यासाठी आमचा हा मोर्चा आहे. गेल्या चार-पाच दिवसांपासून ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन सुरू आहे. मात्र, भाजप आणि आरएसएसचे लोक आंदोलक महिलांना आणि तरुणांना मारहाण करत आहेत. याचे अनेक व्हिडिओ पुरावे उपलब्ध आहेत, असा दावा त्यांनी केला. ज्ञानेश कुमार यांच्याबाबत सर्व माहिती आपल्याकडे असून, त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करणारे मोदी सरकार मोठी चूक करत आहे, असेही ते म्हणाले.
दिल्लीतील परिस्थितीवर बोलताना राहुल गांधी म्हणाले की, दिल्लीत मतांच्या चोरीविरोधात निदर्शने सुरू आहेत. पण संपूर्ण शहराला तुरुंगात आणि किल्ल्यात बदलले गेले आहे. लोकांना शहरात येण्यापासून रोखण्यासाठी मेट्रो, ट्रेन आणि बसेस बंद केल्या जात आहेत. रस्त्यांवर २० ते ३० हजार पोलीस तैनात करण्यात आले आहेत. पोलीस कर्मचारीही या परिस्थितीने त्रस्त असून, त्यांना तरुणांवर लाठीमार करण्याचे आदेश दिले जात आहेत, तर दुसरीकडे आरएसएसच्या लोकांना मोकळी सूट दिली जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.