धक्कादायक! भाजपच्या माजी आमदाराला लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण करत संपवलं; नक्की काय घडलं?

Former BJP MLA Death : राजस्थानच्या भरतपूर जिल्ह्यात स्टोन क्रशर सुरू करण्यावरून झालेल्या वादात भाजपचे माजी आमदार अतार सिंग भडाना गंभीर जखमी झाले. जयपूरमधील एसएमएस रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
Rajasthan former BJP MLA death :
Rajasthan former BJP MLA death :
Published On: 

Rajasthan former BJP MLA death : राजस्थानमधील भरतपूर जिल्ह्यात भाजपच्या माजी आमदाराची हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली. स्टोन क्रशर सुरू करण्यावरून वाद झाला होता. त्यानंतर गावकऱ्यांनी अचानक केलेल्या हिंसक हल्ल्यात भाजपचे माजी आमदार अतार सिंग भडाना यांचा मृत्यू झाला. ७० ते ८० जणांनी भडाना यांना लाठ्या-काठ्यांनी आणि दगडांनी बेदम मारहाण करून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या भीषण हल्ल्यामुळे राजस्थानच्या राजकारणात आणि परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भडाना यांची हत्या रविवारी रात्री झाली. भोंडा गावात स्टोन क्रशरवरून वाद सुरू होता. त्यावेळी आधी बाचाबाची झाली. भाजप नेते भडाना आणि स्थानिक गावकऱ्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून क्रशरवरून वाद सुरू होता. रविवारी गावकऱ्यांनी भाजप नेत्याला बेदम मारहाण करत जीव घेतला.

Rajasthan former BJP MLA death :
ज्ञानेश कुमारांना सोडणार नाही! सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करणार; राहुल गांधींचा सर्वात मोठा निर्णय

भुसावरचे सर्कल ऑफिसर नीरज भारद्वाज यांनी पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार गावात भडाना आणि त्यांचा साथीदार गगन शर्मा यांच्यावर काठ्या आणि दगडांनी हल्ला करण्यात आला. दोघेही गंभीर जखमी झाले होते आणि त्यांना सुरुवातीला वीर येथील रुग्णालयात नेण्यात आले. नंतर भडाना यांना जयपूर येथील एसएमएस रुग्णालयात, तर शर्मा यांना भरतपूर येथील रुग्णालयात हलवण्यात आले. एसएमएस रुग्णालयात उपचारादरम्यान भडाना यांचे निधन झाले.

Rajasthan former BJP MLA death :
Thackeray : ठाकरे बंधूंवर गुन्हे दाखल; पोलिसांची मोठी कारवाई, मुंबईत राजकीय वातावरण तापले

पोलिसांनी सांगितले की, गावकऱ्यांनी भडाना यांच्यावर जमिनीवर अतिक्रमण केल्याचा आणि अवैध खाणकाम केल्याचा आरोप केला होता. क्रशर मागील वर्षभर बंद होता, तो पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न केला जात होता. त्यातूनच मतभेद वाढले अन् गावकारी संतापले.

स्टोन क्रशर पुन्हा सुरू करू नका, त्यासाठी १० ते १५ दिवसांपासून शांततापूर्ण आंदोलन करत असल्याचा दावा गावकऱ्यांनी केला आहे. गावकऱ्यांनी सांगितले की, भडाना रविवारी संध्याकाळी ४० ते ५० लोकांना घेऊन घटनास्थळी आले होते. त्यांनी आंदोलनस्थळावरून गावकऱ्यांना हटवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर दोन गटामध्ये संघर्ष सुरू झाला. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर मारहाणीचा आरोप केला आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी गावात अतिरिक्त पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com