Sanjay Singh : संजय सिंह यांची तिहार जेलमधून सुटका; अरविंद केजरीवाल यांच्यासह आपच्या नेत्यांना जामीन मिळणार का?

Sanjay Singh/Delhi Liquor Policy Case : आम आदमी पार्टीचे नेते संजय सिंह यांची आजच तुरुंगातून सुटका करण्यात आली आहे. त्यांच्या जामीन अर्जावर स्वाक्षरी झाल्याची माहिती होती, आणि जामीन आदेश तिहार तुरुंगात पोहोचला होता.
Sanjay Singh
Sanjay SinghSaam Digital

Sanjay Singh

आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंह तिहार तुरुंगातून बाहेर आले आहेत. दारू घोटाळ्यात त्यांना सहा महिन्यांनी जामीन मिळाला. काही वेळापूर्वीच त्यांच्या सुटकेचे आदेश तुरुंगात पोहोचले होते. यानंतर तुरुंग प्रशासनाने औपचारिकता पूर्ण करण्यास सुरुवात केली. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर संजय सिंह यांनी, तुरुंगाची दारं तोडली जातील, केजरीवाल, सिसोदिया आणि सत्येंद्र जैन यांची सुटका केली जाईल, असं म्हटलं आहे. तुरुंगातून बाहेर येताच आपच्या कार्यकर्त्यांनी संजय सिंह यांच जोरदार स्वागत केलं. संजय सिंह आधी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जाणार आहेत.

दिल्ली दारू घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेल्या संजय सिंग यांना 2 एप्रिल रोजी सर्वोच्च न्यायालयाने 6 महिन्यांनंतर जामीन मंजूर केला होता. मात्र, त्यांच्या प्रकृतीच्या समस्येमुळे काल औपचारिकता पूर्ण होऊ शकली नाही. बुधवारी सकाळी त्यांची पत्नी अनिता सिंग जामीन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी न्यायालयात पोहोचल्या होत्या. दोन लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर आणि तेवढ्याच रकमेचा जामीन मंजूर झाला होता. सायंकाळी त्यांचा जामीन आदेश तिहार तुरुंगात पोहोचला आणि त्यानंतर त्यांची जामिनावर सुटका करण्याची प्रक्रिया सुरू झाली.

संजय सिंह तुरुंगातून बाहेर येण्यापूर्वीच तिहारबाहेर आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांची गर्दी केली होती. सर्व प्रथम संजय सिंह पक्ष कार्यालयात जातील आणि तेथे कार्यकर्त्यांना संबोधितही करतील. संजय सिंह आधी सीएम हाऊसमध्ये जाऊन अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांची भेट घेणार असल्याचेही बोलले जात आहे.

Sanjay Singh
Heatwave Warning: देशभरात वाढला तापमानाचा पारा, केंद्र सरकारची राज्यांना अ‍ॅडव्हायझरी; दिल्या महत्त्वाच्या सूचना

सुप्रीम कोर्टात 2 एप्रिल रोजी झालेल्या सुनावणीत कोर्टाने ईडीला विचारले होते की, संजय सिंह यांना आणखी काही दिवस तुरुंगात ठेवण्याची गरज आहे का? संजय सिंग यांच्या 6 महिन्यांच्या तुरुंगात असताना त्यांच्या विरोधात कोणतेही पुरावे सापडले नाहीत, त्यामुळे त्यांना अजून तुरुंगात ठेवून ईडीला काय करायचं आहे, अशा सवाल कोर्टाने विचारला होता. त्यावर ईडीने, संजय सिंह यांच्या जामीनावर आपला कोणताही आक्षेप नसल्याचं म्हटलं आहे.

Sanjay Singh
Recruitment News: सरकारी नोकरी करण्याची सुवर्णसंधी; रेल्वेत 9144 पदांसाठी भरती, जाणून घ्या अर्ज कसा आणि केव्हा करायचा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com