Russia News : ट्रम्पचं भारताला ब्लॅकमेलिंग, रशिया भडकला; अमेरिकेविरोधात अण्वस्त्र तैनातीचा इशारा, VIDEO

Russia against america : अमेरिका भारतावर दादागिरी करत असल्याने रशिया अमेरिकेविरोधात चांगलाच भडकलाय.. रशियाने थेट अण्वस्त्रसज्ज मिसाईल डागण्याचा इशारा दिलाय...त्यामुळे आता जग अणुयुद्धाच्या संकटात सापडण्याची शक्यता आहे... पाहूयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट...
Russia update
Russia NewsSaam tv
Published On

डोनाल्ड ट्रम्पकडून टॅरिफच्या मुद्द्यावर भारताला ब्लॅकमेलिंग केलं जातंय.. त्यावरुन रशिया अमेरिकेवर चांगलाच भडकलाय... एवढंच नाही तर रशियाने 1987 पासूनचा अमेरिकेसोबतचा अण्वस्त्र करार रद्द केलाय....त्यामुळे जगावर अणुयुद्धाचे ढग जमा व्हायला सुरुवात झालीय... मात्र रशियाचा अमेरिकेसोबतचा इंटरमेडिएट रेंज न्यूक्लियर फोर्स करार नेमका काय होता? पाहूयात...

1987 मध्ये शीतयुद्धानंतर अमेरिका आणि रशियामधील द्विपक्षीय करार

500 ते 5500 किमीचे अण्वस्त्र तैनात आणि निर्माण करण्यावर निर्बंध

अमेरिका आणि रशियाने एकमेकांच्या सीमाभागात अण्वस्त्र तैनातीवर निर्बंध

2018 मध्ये अमेरिकेने रशियासोबतचा करार रद्द केला

अमेरिका मिसाईल सिस्टीम तैनात करेपर्यंत हल्ला न करण्याची रशियाची भूमिका

Russia update
Flat Maintenance : आता फ्लॅटच्या आकारानुसार मेटेनेन्स द्यावा लागणार; मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय

मात्र आता रशियासोबत व्यापार करणाऱ्या देशांविरोधात अमेरिकेने तुघलकी कर लादायला सुरुवात केलीय.. तर भारतावर 50 टक्के आयात शुल्क आणि रशियासोबतच्या व्यापारामुळे दंड आकारण्याची घोषणा डोनाल्ड ट्रम्पने केलीय... एवढंच नाही तर अमेरिकेने युक्रेन विरोधात रशियाचं युद्ध सुरु असताना रशियाच्या सामरिक क्षेत्रात दोन अण्वस्त्रसज्ज पाणबुड्या पाठवण्याची घोषणा केली..

Russia update
Star Cricketer : स्टार क्रिकेटपटूला अत्याचार प्रकरणात अटक होणार; हायकोर्टाचा मोठा निर्णय

आणि रशियाचे माजी राष्ट्राध्यक्ष दिमित्री मेदवेदेव यांनीही अमेरिकेच्या नांग्या ठेचण्याचा इशारा दिलाय...तर अमेरिकेने डेन्मार्क, ऑस्ट्रेलिया आणि फिलिपिन्समध्ये INF मिसाईल तैनात केल्याचा दावा केलाय... मात्र अमेरिका आणि रशियामध्ये अण्वस्त्रयुद्ध भडकल्यास आशिया आणि पॅसिफिक महासागरात अस्थिरता निर्माण होणार हे मात्र निश्चित...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com