एकीकडे उन्हाचा कडाका, दुसरीकडे अवकाळी पावसाचा तडाखा; महाराष्ट्राला हवामान विभागाचा अलर्ट

weater update : महाराष्ट्रातील काही भागात अवकाळी पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. अवकाळीने शेतकऱ्यांचं नुकसान होण्याची शक्यता आहे.
weather update
maharashtra rain Saam tv
Published On
Summary

देशातील काही राज्यांत अवकाळी पावसाची शक्यता

काही राज्यात हलक्या स्वरुपाच्या पाऊस कोसळणार

महाराष्ट्रातही ५ दिवस पावसाची शक्यता

उत्तर प्रदेश, दिल्ली, महाराष्ट्रात कडक उन्हाने नागरिकांच्या अंगाची लाही लाही होत आहे. अनेक राज्यात पारा ४० डिग्रीपर्यंत पोहोचला आहे. तर काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. काही राज्यांसाठी पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. महाराष्ट्रालाही अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

जम्मू-काश्मीर, लडाखमध्ये पाऊस आणि बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. तसेच ५० किमी प्रति तासाने वारा वाहण्याची शक्यता आहे. १७-१९ एप्रिलदरम्यान हिमाचल प्रदेश, १७ एप्रिल रोजी उत्तरांखंडमध्ये हलक्या स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. जम्मू-काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेशमध्ये गारपीट होण्याची शक्यता आहे.

weather update
Maharashtra Weather : राज्यात ऊन पावसाचा खेळ सुरू; 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट; आजचे हवामान कसे असेल? वाचा

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अरूणाचल प्रदेशमध्ये १५, १८,१९ एप्रिल, मेघालयात १७ आणि १८ एप्रिल, नागालँडमध्ये १८ एप्रिलमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. या व्यतिरिक्त मध्य, पूर्व, पश्चिम आणि दक्षिण भारतातील काही भागांत उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. तर १५ एप्रिल रोजी आसाम आणि मेघालयमध्ये गारपिटीची शक्यता आहे. दक्षिण भारतात १८, १९ एप्रिल रोजी अंतर्गत कर्नाटकात मेघगर्जनेसह पावासाची शक्यता आहे. १७ आणि १८ एप्रिल रोजी आंध्र प्रदेशात पावसाची शक्यता आहे. पश्चिम भारतातील १८-२१ एप्रिल दरम्यान मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे.

weather update
Rain Alert : पुढचे ५ दिवस राज्यासाठी महत्वाचे, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता; 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट

विदर्भात उष्णतेने गाठला कडेलोट

विदर्भात सूर्यदेव अक्षरशः कोपल्याचे दिसत आहे. एप्रिलच्या मध्यातच उष्णतेने कडेलोट गाठलाय. यामुळे जनजीवन अक्षरशः होरपळून निघत आहे. विदर्भातील बहुतांश शहरांमध्ये तापमान ४२ ते ४४ अंशांच्या दरम्यान पोहोचलंय. सर्वाधिक तापमान अकोल्यात नोंदवलं गेलं असून पारा तब्बल ४४.२ अंशांवर गेलाय.

अमरावतीत ४४ अंश, वर्ध्यात ४३.९ आणि नागपुरात ४३.४ अंश तापमानाची नोंद झाली आहे. चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये ४२.६, तर यवतमाळमध्ये ४२.८ अंश तापमान नोंदवलं गेलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com