Gautam Singhania : प्रसिद्ध उद्योगपतीचा स्पीड बोट उलटून भीषण अपघात, रशियन महिलेसह ४ भारतीय वाहून गेले

Gautam Singhania Boat Accident : मालदीवमध्ये स्पीडबोट उलटल्याने रेमंड समूहाचे अध्यक्ष गौतम सिंघानिया जखमी झाले असून दोन भारतीय बेपत्ता आहेत. बचाव कार्य सुरू असून सिंघानिया यांच्यावर मुंबईत उपचार सुरू आहेत.
Gautam Singhania : प्रसिद्ध उद्योगपतीचा स्पीड बोट उलटून भीषण अपघात, रशियन महिलेसह ४ भारतीय वाहून गेले
Raymond Chairman Gautam Singhania Maldives Speedboat AccidentSaam Tv
Published On
Summary
  • मालदीवमध्ये स्पीडबोट अपघात

  • रेमंड समूहाचे अध्यक्ष गौतम सिंघानिया किरकोळ जखमी

  • दोन भारतीय बेपत्ता, शोधमोहीम सुरू

  • मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू

Raymond Chairman Gautam Singhania Maldives Speedboat Accident रेमंड समूहाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय गौतम सिंघानिया यांचा मालदीवमध्ये भीषण अपघात झाला आहे. स्पीडबोट उलटल्याने हा अपघात झाला असून सिंघानिया यांना किरकोळ दुखापत झाली आहे. त्यांच्यावर सध्या मुंबईत उपचार सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. या स्पीडबोटमध्ये आणखी दोन भारतीय असून ते सध्या बेपत्ता आहेत.

मालदीव मधील स्थानिक वृत्तांच्या माहितीनुसार, पर्यटकांना घेऊन जाणारी एक स्पीडबोट शुक्रवारी पहाटे ‘व्ही फेलिधू’ जवळ उलटली. या स्पीडबोटवर एकूण सात जण होते. त्यात यूके आणि रशियातील दोन महिला तसेच भारतातील पाच पुरुषांचा समावेश होता. या अपघातात पाच जण समुद्रात वाहून गेले, त्यात रशियातील एक महिला आणि भारतातील चार पुरुषांचा समावेश आहे.

Gautam Singhania : प्रसिद्ध उद्योगपतीचा स्पीड बोट उलटून भीषण अपघात, रशियन महिलेसह ४ भारतीय वाहून गेले
Sangli : नामांकित शिक्षण संस्थेच्या संचालकाची निर्घृण हत्या; अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये मृतदेह सापडला, सांगलीतील धक्कादायक घटना

या अपघातग्रस्त बोटवर गौतम सिंघानिया हे देखील त्या पर्यटकांमध्ये होते. बोट चालक हरी सिंग यांसह आणखी दोन भारतीय पुरुष बेपत्ता असून शोध मोहीम सुरू आहे. मात्र सिंघानिया यांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. त्यांना किरकोळ दुखापत झाली आहे. गौतम सिंघानिया यांना दक्षिण मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच योग्य देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com