आरक्षणाच्या मुद्द्यावर सुरू असलेल्या चर्चेदरम्यान केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मोठं विधान केलं आहे. त्यांनी आरक्षण सोडण्यासाठी एक अट ठेवली असून, ती पूर्ण झाल्यास आपण आरक्षण सोडण्यास तयार असल्याचं म्हटलं आहे. केंद्रीय मंत्रिमंडळातील प्रमुख दलित चेहरा म्हणून आठवले यांच्या या विधानाला विशेष महत्व प्राप्त झालं आहे. दिल्लीमध्ये आरक्षण हटाओ अंतर्गत मोठं आंदोलन झाल्यानंतर त्यांचं हे वक्तव्य समोर आलं आहे.
छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये रामदास आठवले यांनी यावर भाष्य केलं. जातीय आधारावर आरक्षणाची तरतूद आहे. जर जातिवाद संपला, तर आम्ही आरक्षण सोडण्यास तयार आहोत. जो पर्यंत जातिवाद संपणार नाही, तो पर्यंत आरक्षण लागू राहील. विशेष म्हणजे आठवले यांनी गेल्या आठवड्यात झारखंडमध्येही अशाच प्रकारच वक्तव्य केलं होतं. रांची येथे बोलताना त्यांनी जर जातिव्यवस्था संपली, तर आम्ही आरक्षण सोडण्यास तयार आहोत असं म्हटलं होतं.
ऑगस्ट महिन्यात राजधानी दिल्लीमध्ये जंतर-मंतरवर आरक्षण व्यवस्थेच्या विरोधात मोठं आंदोलन करण्यात आलं होतं. यावेळी पोलिसांनी 50 हून अधिक आंदोलकांना ताब्यात घेतलं होतं. या आंदोलनादरम्यान आंदोलकांनी जातीनुसार नव्हे, तर आर्थिकदृष्ट्या गरीब असलेल्या लोकांना आरक्षण देण्यात यावं, अशी मागणी केली होती. सोशल मीडियावरही ‘आरक्षण हटाओ आंदोलन’ या नावाने मोहीम सुरू करण्यात आली होती.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.