

अयोध्येतील राम मंदिराबाबत मोठी अपडेट आली आहे. या राम मंदिरातील मूर्तीची प्राणप्रतिष्ठा २२ जानेवारी रोजी होणार आहे. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील हजेरी लावणार आहे. पंतप्रधान कार्यालायकडून 22 जानेवारीच्या तारखेवर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. (Latest News Update)
अयोध्येतील राम मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास महाराज यांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ जानेवारी ते २४ जानेवारीदरम्यान मंदिरात धार्मिक संस्कार पार पाडण्यात येणार आहे. यामुळे ५ जानेवारी ते २४ जानेवारीदरम्यान अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे.
दरम्यान, पंतप्रधान कार्यालायकडून 22 जानेवारीच्या तारखेवर शिक्कामोर्तब झाल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील सोहळ्याला अयोध्येला येणार आहे.
मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी सांगितलं की, 'तीन मजली असलेल्या राम मंदिराच्या तळमजल्याचे कामकाज हे डिंसेबरच्या शेवटपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. तसेच मंदिरातील मूर्तीची प्राणप्रतिष्ठा २२ जानेवारी रोजी होणार आहे.
'राम मंदिराच्या शिखरावर बसवलेल्या उपकरणाची रचना करण्याचंही काम सुरु आहे. या उपकरणामुळे राम मूर्तीच्या कपाळावर क्षणभर सूर्याची किरणे पडतील. या उपकरणाचं काम देखील अंतिम टप्प्यात आलं आहे. या मंदिराचेही काही फोटो ट्रस्टने शेअर केले होते.
पहिल्या मजल्यावरील पिलरचं जवळपास ५० टक्के काम पूर्ण झालं आहे. तर तळमजल्याचे काम नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे .
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.