राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपकडून ११ उमेदवारांची घोषणा; कुणाला मिळालं तिकीट? जाणून घ्या

BJP Declares Rajya Sabha Nominees : भाजपने राज्यसभा निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची घोषणा केली आहे. गुजरातमधून राजुभाई शुक्ला, मुकेशभाई रथवा आणि मानसिंग परमार हे पक्षाचे उमेदवार असतील. मध्य प्रदेशमधून तरुण चुघ आणि रजनीश अग्रवाल निवडणूक लढवणार आहेत.
BJP Reshuffle:
BJP leadership announces 11 candidates for the upcoming Rajya Sabha elections across multiple states.Saam tv
Published On
Summary
  • भाजपने आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी 11 उमेदवारांची घोषणा केली.

  • गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, मणिपूर आणि अरुणाचल प्रदेशातील नेत्यांना संधी

  • सामाजिक आणि राजकीय समीकरणांचा विचार करून उमेदवारांची निवड

भारतीय जनता पक्षाने गुरुवारी आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी ११ उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. पक्षाने अरुणाचल प्रदेशमधून ताई तागक यांना, तर गुजरातमधून राजुभाई शुक्ला, मुकेशभाई रथवा आणि मानसिंग परमार यांना उमेदवारी दिली आहे. तरुण चुघ आणि रजनीश अग्रवाल मध्य प्रदेशमधून निवडणूक लढवतील.

BJP Reshuffle:
BJP ला आणखी एक मोठा धक्का; ऐन निवडणुकीआधी बडा नेता सोडणार पक्षाची साथ

तर मणिपूरमधून ए.शारदा देवी, राजस्थानमधून अलका गुर्जर आणि सतिश पुनिया यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांनी राजस्थान विधानसभेत विरोधी पक्षाचे उपनेते म्हणूनही काम पाहिले आहे. सध्या त्यांच्याकडे हरियाणा भाजपचे प्रभारी म्हणून महत्त्वाची जबाबदारी आहे. जाट समाजाचे असल्याने, ते राजस्थान आणि हरियाणा या दोन्ही राज्यांमध्ये सामाजिक आणि राजकीय समीकरणे संतुलित ठेवण्यात पारंगत मानले जातात. बिहार विधानसभा निवडणुकीदरम्यान ते पक्षाच्या कार्यकर्त्यांसोबत प्रचार करताना दिसले होते.

तर पंजाबमधून तरुण चुग यांनाही उमेदवारी देण्यात आली आहे. अमृतसरमधून येणारे तरुण चुग हे कमी वयातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित आहेत. सध्या ते भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय महासचिव आहेत. त्यांना पक्षाचे संकटमोचक म्हटलं जाते. तसेच त्यांची ओळख निवडणुकींचे रणनीतीकार देखील आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com