Government Give Mobile Phones To Girls: हे राज्य सरकार मुलींना देणार त्यांच्या आवडीचा मोबाइल, नेमकं काय आहे कारण?

Assembly Election: निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री अशोक गेहलोत (CM Ashok Gehlot) यांनी महिलांसाठी खास योजना आणली आहे.
Mobile Phones
Mobile Phones Saam TV
Published On: 

Rajasthan Government: निवडणुकाजवळ (Election) आल्यानंतर चांगली मतं मिळावी आणि आपली सत्ता यावी यासाठी प्रत्येक पक्ष प्रयत्न करत असतात. यासाठी वेगवेगळ्या घोषणा केल्या जातात. अशामध्ये यावर्षी राजस्थानमध्ये विधानसभेच्या निवडणुका (Assembly Election) होणार आहेत. या निवडणुकीसाठी सर्वच पक्ष आतापासून जोरदार तयारीला लागले आहेत. अशामध्ये राजस्थानच्या गेहलोत सरकार (Gehlot Government) जनतेला आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे.

Mobile Phones
Mumbai Local CCTV: लोकलमध्ये विद्यार्थिनीवर अतिप्रसंग करणाऱ्या नराधमाचे CCTV फुटेज आले समोर, पाहा VIDEO

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री अशोक गेहलोत (CM Ashok Gehlot) यांनी महिलांसाठी खास योजना आणली आहे. या योजनेचा महिलांना चांगला फायदा होणार आहे. गेहलोत सरकारने आणलेली ही योजना मोबाइलबाबत आहे. या योजनेअंतर्गत महिलांना त्यांच्या आवडीचा मोबाइल खरेदी करता येणार आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी सांगितले की, 'सरकार ऑगस्टमध्ये रक्षाबंधनाच्या दिवशी ही योजना सुरू करणार आहे. स्मार्टफोनच्या बदल्यात आम्ही महिलांना विशिष्ट रोख रक्कम देऊ.'

Mobile Phones
Nawab Malik News: नवाब मलिक यांची अवस्था गंभीर; त्यांना नेमकं झालंय काय? वकिलांनी कोर्टात दिली सर्व माहिती

गेहलोत यांनी सांगितले की, 'सरकार महिलांना एका प्रकारचे मोबाइल देऊ शकते. पण बाजारात अनेक प्रकारचे मोबाइल आहेत. त्यामुळे आम्ही महिलांना पर्याय देऊ की तुम्ही जा आणि तुमच्या आवडीचा फोन घ्या. सरकार हा मोबाईल घेण्यासाठी एक निश्चित रक्कम देईल.'

काही दिवसांपूर्वी गेहलोत यांनी सांगितले होते की, 'आम्ही तुम्हाला एक मोफत स्मार्टफोन देऊ ज्यामध्ये तुम्हाला ३ वर्षांसाठी मोफत इंटरनेट मिळेल.' गेहलोत यांनी 2021 च्या बजेटमध्ये राजस्थानमधील 1.35 कोटी महिलांना स्मार्टफोन देण्याची घोषणा केली होती. काही दिवसांपूर्वी त्यांनी यावर्षी 30 ऑगस्टपासून रक्षाबंधनापासून टप्प्याटप्प्याने मोबाइल देण्यात येणार असल्याचे देखील सांगितले.

Mobile Phones
Weather Forecast : पावसाळ्याचे दिवस सुरू झाले आणि तिकडे विदर्भात २ दिवस उष्णतेची लाट; हवामान खात्याचा अंदाज

या योजनेबाबत मुख्यमंत्री गेहलोत यांनी पुढे सांगितले की, मोबाईल ही अशी वस्तू आहे. जर तुम्ही बाजारात खरेदी करायला गेलात तर तुम्हाला तुमच्या आवडीचा मिळेल. म्हणजेच कोणता, किती जीबीचा मोबाईल घ्यायचा आहे. तुम्हाला कोणता ब्रँड आवडतो जो तुम्हाला घ्यायचा आहे. कोणते मॉडेल खरेदी करायचे? यासंदर्भात आम्ही कंपन्यांशी बोलत आहोत, असे त्यांनी सांगितले. कंपन्यांनी महागाई रिलीफ कॅम्पसारखे काउंटर उभारून लोकांना पर्याय द्यावा. महिला सक्षमीकरण हा स्मार्टफोन देण्यामागचा गेहलोत सरकारचा मुख्य उद्देश आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.