Mumbai Local CCTV
Mumbai Local CCTVSaam Tv News

Mumbai Local CCTV: लोकलमध्ये विद्यार्थिनीवर अतिप्रसंग करणाऱ्या नराधमाचे CCTV फुटेज आले समोर, पाहा VIDEO

Mumbai Local News: या नराधमाचे सीसीटीव्ही फूटेज (CCTV Footage) समोर आले आहे.
Published on

Mumbai News: मुंबईमध्ये धावत्या लोकलमध्ये (Mumbai Local) २० वर्षांच्या विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न झाल्याची घटना बुधवारी घडली होती. याप्रकरणातील आरोपीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या होत्या. या संतापजनक घटनेनंतर तीव्र संताप व्यक्त केला जात होता. अशामध्ये या नराधमाचे सीसीटीव्ही फूटेज (CCTV Footage) समोर आले आहे. हा व्हिडिओ पाहून तुमचाही राग अनावर होईल.

Mumbai Local CCTV
Sharad Pawar News: 'महाराष्ट्राचं भाग्य आहे की...'; मुख्यमंत्र्यांच्या जाहिरातीवरून शरद पवारांचा टोला

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईमध्ये विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या नराधमाचे सीसीटीव्ही फूटेज समोर आले आहे. प्लॅटफॉर्मवरुन जाणाऱ्या महिला प्रवाशाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न आरोपीने केल्याचे सीसीटीव्हीत दिसत आहे.

या सीसीटीव्ही व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एक महिला घाई घाईमध्ये लोकल पकडण्यासाठी जात होती. लाल रंगाच्या टी शर्ट घातलेला आरोपी चालत चालत तिच्या अगदी अंगावर येतो. शेवटी ही महिला बाजूला होते. त्यानंतर समोरुन येणाऱ्या एका व्यक्तीला आरोपी धडकतो आणि तिथून निघून जातो.

बुधवारी सकाळी सीएसएमटी ते मस्जिद स्थानाकादरम्यान धावत्या लोकलमध्ये आरोपीने २० वर्षांची विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. बुधवारी सकाळी ७:२८ च्या सुमारास ही घटना घडली आहे. ही विद्यार्थिनी लेडीज कोचमध्ये एकटी असल्याचे पाहून त्याने फायदा घेत लगट करण्याचा प्रयत्न केला. या विद्यार्थिनीने कशीबशी स्वत:ची सुटका करुन घेत लोकल मस्जिद बंदर रेल्वे स्थानकावर येताच तिने ट्रेनमधून उतरून स्वतःचा बचाव केला.

Mumbai Local CCTV
Ajit Pawar News: अजितदादा राजकारणातील अमिताभ बच्चन, ते सर्वांनाच हवे असतात; सुप्रिया सुळे काय म्हणाल्या, वाचा...

त्यानंतर जीआरपी आणि आरपीएफच्या संयुक्त पथकाने आरोपी नवाज करीमला (40 वर्षे) याला अवघ्या ८ तासांत अटक केली. पोलिसांनी त्याच्यावर बलात्काराच्या प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करत त्याच्याविरोधात कारवाई केली. आरोपी मस्जिद बंदर येथील एका दुकानामध्ये कामाला होता. अशा घटनांमुळे आता लोकलमधून सकाळच्या वेळी प्रवास करताना महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित राहिला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com