Rajasthan government announces a major midnight reshuffle transferring 64 IPS officers across several districts.
Rajasthan government announces a major midnight reshuffle transferring 64 IPS officers across several districts.Saam Tv

मध्यरात्री 64 IPS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; पोलीस दलात खळबळ

Transfers 64 IPS Officers Midnight: सरकारने मध्यरात्री मोठा निर्णय घेत 64 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. 22 जिल्ह्यांतील पोलीस अधीक्षकांसह अनेक DIG आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची नवीन नियुक्ती करण्यात आली असून पोलीस प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे.
Published on

देशातील अनेक राज्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून पोलिस बादलीचा धडाका सुरूच आहे. अशातच शुक्रवारी मध्यरात्री राजस्थान सरकारने 22 जिल्ह्यांतील पोलिस आधीक्षकांच्या बदल्या केल्या आहे. यापैकी 9 अधिकाऱ्यांची उपमहानिरीक्षकपदी नियुक्त करण्यात आली आहे. सायबर गुन्हे, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आणि अंमली पदार्थ विरोधी विभागातील अनेक अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे.

Rajasthan government announces a major midnight reshuffle transferring 64 IPS officers across several districts.
LPG shortage : देशात गॅस सिलिंडरचा तुटवडा, खासदारांना संसदेत चहा-कॉफीही मिळेना, खासदाराच्या दाव्याने खळबळ

सरकारने जारी केलेल्या आदेशानुसार अजय सिंग यांना जयपूरमध्ये अतिरिक्त पोलिस आयुक्त 1 म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. योगेश यादव यांना अमली पदार्थ पथकातून ATS मध्ये DIG म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राशी डोंगरा यांची जयपूर ग्रामीण पोलिस आधीक्षकावरून CID मध्ये DIG म्हणून बदली करण्यात आली आहे. विनय कुमार यांना राज्यपालांचे सहाय्यक कॅम्प म्हणून जबाबदारी सोपावली आहे. DIG आनंद शर्मा यांची JDA, राम मूर्ती जोशी यांची ACP उदयपूर, सुमित महराडा यांची SP सायबर जयपूर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मोनिका सेन यांची SP पाली, डॉक्टर अमृत दुहान यांची उदयपूरमधून जोधपुर ग्रामीणमध्ये नियुक्ती करण्यात आली आहे. जयेश मैत्रेय यांची बंसवारा येथे SP म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

Rajasthan government announces a major midnight reshuffle transferring 64 IPS officers across several districts.
Shocking : 'कमी पगार मिळतो' म्हणून उठताबसता टोमणे; वैतागलेल्या नवर्‍याने बायकोसह ७ वर्षांच्या मुलीची केली निर्घृण हत्या

IPS अधिकाऱ्यांच्या बदल्यांची यादी

अजय सिंह – अतिरिक्त पोलीस आयुक्त (प्रथम), जयपूर आयुक्तालय

योगेश यादव – डीआयजी, एटीएस

अनिल कुमार (द्वितीय) – डीआयजी, पोलीस मुख्यालय

मनीष अग्रवाल (द्वितीय) – डीआयजी, इंटेलिजन्स पोलीस मुख्यालय

विकास शर्मा – डीआयजी, कार्मिक

आनंद शर्मा – डीआयजी, जेडीए

राममूर्ती जोशी – डीआयजी, एसीबी उदयपूर

आलोक श्रीवास्तव – डीआयजी, हाऊसिंग

राशी डोगरा डुडी – डीआयजी, सीआयडी (सीबी) जयपूर

ममता गुप्ता – डीआयजी, सुरक्षा

आदर्श सिधू – डीआयजी, आर्म्ड बटालियन, जयपूर

अभिजीत सिंह – डीआयजी, एएनटीएफ जयपूर

शांतनू कुमार सिंह – डीआयजी, सायबर क्राइम, जयपूर

देवेंद्र कुमार बिश्नोई – डीआयजी, आरपीटीसी जोधपूर

विनीत कुमार बंसल – डीआयजी, आय बटालियन-द्वितीय जयपूर

नारायण टोगस – डीआयजी, एसीबी अजमेर

ओमप्रकाश मीना – डीआयजी, एसीबी-तृतीय जयपूर

सुधीर जोशी – एसपी, झुंझुनू

राज कुमार चौधरी – एसपी, इंटेलिजन्स जोधपूर

संजीव नैन – एसपी, जयपूर ग्रामीण

नरेंद्र सिंह – एसपी, बाडमेर

योगेश गोयल – एसपी, एसीबी जयपूर

मोनिका सेन – एसपी, पाली

ज्ञानचंद्र यादव – एसपी, चुरू

राजेश कुमार यादव – उपसंचालक, आरपीए जयपूर

हनुमान प्रसाद मीना – डीसीपी (क्राइम), जयपूर

नरेंद्र सिंह मीणा – एसपी, हनुमानगढ

राजेंद्र कुमार मीना – एसपी, इंटेलिजन्स जयपूर

मृदुल कच्छावा – एसपी, बिकानेर

कावेंद्र सिंह सागर – एसपी, सिव्हिल राइट्स पोलीस मुख्यालय

केवलराम राव – एसपी, जीआरपी जोधपूर

लोकेश सोनवाल – एसपी, जीआरपी अजमेर

डॉ. महावीर सिंह राणावत – प्राचार्य, पोलीस प्रशिक्षण केंद्र, जोधपूर

डॉ. प्यारे लाल शिवरन – एसपी, सीआयडी सीबी जयपूर

सतवीर सिंह – एसपी, कोटपूतली-बहरोड

सतनाम सिंह – एसपी, फलौदी

हर्षवर्धन अगरवाला – एसपी, अजमेर

डॉ. अमृत्ता दुहन – एसपी, उदयपूर

पी. डी. नित्या – एसपी, जोधपूर ग्रामीण

पीयूष दीक्षित – एसपी, करौली

विशनाराम – एसपी, सलुंबर

पुष्पेंद्र सिंह राठोड – एसपी, सिरोही

कमल शेखावत – डीसीपी वेस्ट, जोधपूर

अवनीश कुमार शर्मा – एसपी, बूंदी

वंदिता राणा – एसपी, सतर्कता जयपूर

जयेष्ठा मैत्रेयी – एसपी, बांसवाडा

कुंदन कंवरिया – एसपी, एसओजी

बृजेश ज्योती उपाध्याय – एसपी, भिवाडी (खैरथल-तिजारा अतिरिक्त कार्यभार)

रंजीता शर्मा – डीसीपी, जयपूर (ईस्ट)

हरी शंकर – एसपी, श्रीगंगानगर

सुमित मेहरडा – एसपी, सायबर क्राइम

अमित जैन – एसपी, एएनटीएफ जयपूर

मनीष कुमार चौधरी – डीसीपी (ईस्ट), जोधपूर

निश्चय प्रसाद एम. – डीसीपी (ट्रॅफिक), जयपूर

प्रशांत किरण – डीसीपी (वेस्ट), जयपूर

हेमंत कलाल – एसपी, राजसमंद

कंबले शरण गोपीनाथ – एसपी, डीग

रोशन मीना – एसपी, नागौर

उषा यादव – कमांडंट, हाडी राणी बटालियन, अजमेर

विनय कुमार डी. एच. – परिसहाय, राज्यपाल राजस्थान

पंकज यादव – कमांडंट, प्रथम बटालियन, आरएसी, जोधपूर

आदित्य काकडे – कमांडंट, 9वी बटालियन, आरएसी, टोंक

विशाल जांगिड – कमांडंट, 10वी बटालियन, आरएसी, बिकानेर

शिवानी – कमांडंट, 12वी बटालियन, आरएसी, नवी दिल्ली

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com