Shocking : भयंकर! खेळाचा वाद टोकाला भिडला, कबड्डीपट्टूवर गोळ्या झाडल्या ; ९ जणांना बेड्या

Rajsthan Crime News : राजस्थानातील हनुमानगड जिल्ह्यात कबड्डी खेळाडूंमधील वादातून गोळीबार होऊन १७ वर्षीय खेळाडूचा मृत्यू झाला. या प्रकरणात ९ आरोपींना अटक करण्यात आली असून मुख्य आरोपी फरार आहे.
KABADDI PLAYER SHOT DEAD IN RAJASTHAN HANUMANGARH FIRING CASE
KABADDI PLAYER SHOT DEAD IN RAJASTHAN HANUMANGARH FIRING CASESaam Tv
Published On
Summary
  • राजस्थानातील हनुमानगडमध्ये कबड्डी वादातून गोळीबार

  • १७ वर्षीय खेळाडू संदीप कुमारचा मृत्यू

  • ९ आरोपींना अटक, मुख्य आरोपी फरार

  • पोलिसांकडून SIT स्थापन करून तपास सुरू

Rajsthan Crime News राजस्थानमधून मोठी बातमी समोर आली आहे. कबड्डीच्या खेळाडूंमध्ये झालेल्या वादातून गोळीबार होऊन एका खेळाडूचा दुर्दैवी मृत्यू झाला. राजस्थानच्या हनुमानगड जिल्ह्यातील भद्रा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या कलाना गावात ही घटना घडली. या गोळीबार प्रकरणाने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात सहभागी असलेल्या नऊ आरोपींना पोलिसांनी अटक केली असून त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले आहे. न्यायालयाने सर्व आरोपींना ३० मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, मुख्य आरोपी विशाल धनक आणि त्याचे काही साथीदार अद्याप फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

जिल्हा पोलीस अधीक्षक नरेंद्र सिंह मीना यांनी दिलेल्या माहितीनुसार, २२ मे रोजी दुपारी सुमारे ४ वाजता कलाना गावातील ‘श्री श्याम मोबाईल’ दुकानावर गोळीबार झाल्याची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिसर सील करून एफएसएल आणि एमओबी पथकांच्या मदतीने पुरावे गोळा केले आणि सखोल तपास सुरू केला.

KABADDI PLAYER SHOT DEAD IN RAJASTHAN HANUMANGARH FIRING CASE
School Reopen : १५ नाही तर २६ जून, शाळा सुरू होण्याची तारीख का बदलली जाणार? राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

तपासादरम्यान समोर आले की, मुख्य आरोपी विशाल धनक आणि मृत संदीप हे दोघे कबड्डी खेळाडू होते. काही दिवसांपूर्वी खेळावरून त्यांच्यात वाद झाला होता. गावकऱ्यांनी पंचायतीत हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, जुन्या वादातूनच विशालने आपल्या साथीदारांसह हा हल्ला केल्याचे पोलिसांनी सांगितले. विशेष म्हणजे, गोळीबारानंतर विशालने ‘हनुमंगरिया’ या नावाने सोशल मीडियावर पोस्ट करून या घटनेची जबाबदारी स्वीकारली.

KABADDI PLAYER SHOT DEAD IN RAJASTHAN HANUMANGARH FIRING CASE
PM Internship Scheme 2026 : दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना मोठी संधी! दरमहा मिळतील ९००० रुपये, कसे? जाणून घ्या

या गोळीबारात मनीष सिंग (२२) आणि संदीप कुमार (१७) हे गंभीर जखमी झाले. त्यांना भद्रा येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, त्यानंतर हिसार येथे हलवण्यात आले. उपचारादरम्यान २३ मे रोजी संदीपचा मृत्यू झाला, तर मनीषवर अद्याप उपचार सुरू आहेत. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी विशेष तपास पथक (SIT) स्थापन केले. या पथकाने राजस्थान, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि हिमाचल प्रदेश येथे छापेमारी करून प्रदीप, उत्तम, संजय, सुभाष, लालकृष्ण, रमजान, अनिल, सुरेंद्र आणि खेतराम या नऊ आरोपींना अटक केली आहे. सर्व आरोपींची कसून चौकशी सुरू असून, मुख्य आरोपी आणि इतर फरारांना लवकरच अटक केली जाईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com