Fire : केमिकल फॅक्ट्रीमध्ये धडाधड स्फोट, अग्नितांडवात ८ जणांचा जिवंत जळून मृत्यू

Bhiwadi Chemical Factory Blast: राजस्थानातील भिवाडी औद्योगिक क्षेत्रातील केमिकल फॅक्ट्रीमध्ये भीषण स्फोटानंतर लागलेल्या आगीत ८ कामगारांचा मृत्यू झाला. अग्निशमन दलाकडून बचावकार्य सुरू असून दुर्घटनेच्या कारणांचा तपास सुरू आहे.
Bhiwadi Chemical Factory Blast:
Bhiwadi Chemical Factory Blast:Saam
Published On

Bhiwadi chemical factory fire latest updates : राजस्थानमधील भिवाडी येथील एका केमिकल फॅक्ट्रीमध्ये लागलेल्या भीषण आगीत ८ जणांचा जिवंत जळून मृत्यू झाल्याची ङटना समोर आली आहे. केमिकल फॅक्ट्रीमध्ये एकापाठोपाठ एक अनेक स्फोट झाल्यामुळे आग लागली होती. ही आग पसरत संपूर्ण फॅक्ट्रीमध्ये लागली. यामध्ये ८ कामगारांचा आतापर्यंत मृत्यू झाल्याचे समजतेय. तर काहीजण जखमी आहेत. फॅक्ट्रीतील आगीवर नियंत्रण मिळवण्यात येत आहे. आगडोंब पाहता मृताची संख्या आणखी वाढण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यात येत आहे.

भिवाडीमधील खुशखेडा करौली औद्योगिक क्षेत्रातील प्लॉट क्रमांक G1/118B येथे आज सकाळी भीषण आग लागली अचानक स्फोट झाल्यामुळे आग लागलयाची माहिती समोर आली. आगीची माहिती मिळताच अनेक अग्निशमन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.

Bhiwadi Chemical Factory Blast:
Narhari Zirwal : मंत्रालयातील लाच प्रकरणात महत्त्वाची अपडेट, झिरवाळांच्या अडचणी वाढल्या

प्रत्यक्षदर्शींच्या मते, आग काही मिनिटांतच भडकली. कारखान्यात रसायने आणि ज्वलनशील पदार्थ असल्याने आग अतिशय वेगाने पसरली. प्राथमिक अहवालानुसार या अपघातात आठ कामगारांचा जिवंत जळून मृत्यू झाला आहे.

Bhiwadi Chemical Factory Blast:
Accident Video : ऑफिसला जाताना कंटेनर 'यम' बनून आला, सॉफ्टवेअर इंजिनिअरचा चेंदामेंदा, व्हिडिओ पाहून थरकाप उडेल

बचाव कार्यादरम्यान आतापर्यंत ८ कामगारांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. ही दुर्घटना घडली त्यावेळी कारखान्यात २५ ते ३० जण कामगार होते. त्यामधील काहीजण सुरक्षित बाहेर पडले. पण स्फोटामुळे काहीजणांना बाहेर पडताच आले नाही. त्यांचा जळून मृत्यू झालाय. अग्निशमन दल आणि पोलिसांकडून बचावकार्य सुरू आहे. अग्नितांडव पाहाता मृताचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

Bhiwadi Chemical Factory Blast:
Hoarding Collapse : भयंकर! धावत्या कारवर पेट्रोल पंपाचे होर्डिंग कोसळलं, सपा नेत्याचा दुर्दैवी मृत्यू

भिवाडी, खुशखेडा आणि आसपासच्या परिसरातील सर्वच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळावर दाखल झाल्या. तात्काळ आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कामाला लागले. आग अद्याप आटोक्यात आलेली नाही, पण काही प्रमाणात कमी झालेली आहे. स्थानिक प्रशासनाने कारखान्याच्या सुरक्षा व्यवस्थेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. कोणत्या काराणामुळे आग लागली? याचा तपास केला जात आहे. खबरदारीचा उपाय म्हणून परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Bhiwadi Chemical Factory Blast:
Solapur Accident : सोलापुरात भयंकर अपघात, कॉलेजच्या ३ मित्रांचा जागीच मृत्यू

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com