Narhari Zirwal : मंत्रालयातील लाच प्रकरणात महत्त्वाची अपडेट, झिरवाळांच्या अडचणी वाढल्या

Mantralaya Bribery Case Update: मंत्रालयातील लाच प्रकरणात एसीबीने मुख्य संशयित राजेंद्र ढेरिंगे यांच्या घरावर छापा टाकत महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली. या घडामोडींमुळे मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या अडचणी वाढल्या असून विरोधकांकडून राजीनाम्याची मागणी जोर धरत आहे.

ACB Raid Raises Trouble for Minister Narahari Zirwal : मंत्रालयातील लाच प्रकरणाने सध्या राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी राजेंद्र ढेरिंगे याच्या नाशिक रोड येथील निवासस्थानी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) छापा टाकून घराची झडती घेतली आहे. यामध्ये एसीबीच्या हातात महत्त्वाची कागदपत्रे लागल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणामुळे मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून कऱण्यात येत आहे.

झडतीमध्ये महत्त्वाची कागदपत्रे जप्त

एसीबीसा ढेरिंगेच्या घरातून महत्त्वाची आणि संशयास्पद कागदपत्रे हाती लागल्याची माहिती समोर आली आहे. या कागदपत्रांमुळे आता या लाच प्रकरणाच्या चौकशीला मोठी गती मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जप्त केलेली ही कागदपत्रे आज न्यायालयात सादर केली जाऊ शकतात. दरम्यान,  राजेंद्र ढेरिंगे हा मूळचा 'अन्न आणि नागरी पुरवठा' विभागातील कर्मचारी आहे. मात्र, गेल्या वर्षभरापासून तो 'अन्न आणि औषध प्रशासन' विभागामध्ये प्रतिनियुक्तीवर कार्यरत होता. सध्या त्याची नियुक्ती मंत्रालयातील अपील विभागात होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com