Raj Thackeray : सरकारला वांगचुक यांचा बळी घ्यायचा का? राज ठाकरेंचा केंद्र सरकारला संतप्त सवाल

Sonam Wangchuk hunger strike : सोनम वांगचुक यांच्या आमरण उपोषणाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पाठिंबा देत केंद्र सरकारवर टीका केली आहे.
Sonam Wangchuk latest news
Sonam Wangchuk latest newsSaam TV marathi news
Published On

Sonam Wangchuk latest news : केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी सोनम वागचुंक आमरण उपोषणाला बसलेत. मात्र 19 वा दिवस असूनही केंद्र सरकारचा निर्ढावलेपणा कायम आहे. मात्र, असं असलं तरी वागचुंक यांच्या आंदोलनाला आता राजकीय नेत्यांसह कलाकारांचाही पाठिंबा मिळतोय. पाहूयात त्यावरचाच स्पेशल रिपोर्ट...

नीट पेपरफुटीप्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक दिल्लीतील जंतर-मंतरवर आमरण उपोषणाला बसले...या उपोषणाला 19 दिवस होऊनही केंद्र सरकारनं या आंदोलनाची दखल घेतलेली नाही... अशातच वांगचुक यांची प्रकृती खालावून तब्बल 9 किलोनं वजन घटलंय...त्यामुळे सर्व स्तरांमधून त्यांना पाठिंबा वाढत चाललाय. राज ठाकरेंनी तर वांगचुक यांच्या आमरण उपोषणावरून मोदी सरकारला खरमरीत पत्र लिहलंय. यात त्यांनी सरकारला वांगचुक यांचा बळी घ्यायचा का? असा संतप्त सवाल उपस्थित केलाय...

Sonam Wangchuk latest news
Ketan Agarwal : सिया-चेतनने गुपचूप लग्न केलं होतं? राजस्थानच्या 'त्या' मंदिरात पोलिसांच्या हाती काय लागलं?

राज ठाकरेंचा वांगचुक यांना पाठिंबा

प्रचंड वाईट वाटतंय की सरकारने सोनम वांगचुक यांचा आणि पर्यायाने या देशातील आंदोलनाची म्हणून एक जागा आहे तिचा बळीच घ्यायचा ठरवलं आहे. एका चांगल्या मुद्द्यासाठी उभ्या केलेल्या आंदोलनाला चिरडणं, आंदोलनकर्त्याच्या शरीराचे हाल करणं हे सरकारला सहज सोपं आहे. माझी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती आहे की जरा या प्रश्नात लक्ष घाला. फक्त NEET नाही तर एकूणच सर्व परीक्षांमध्ये पारदर्शकता यायला हवी आणि दोषी मंत्र्यांचा राजीनामा यायलाच हवा.

-राज ठाकरे

दरम्यान केंद्र सरकारनं दखल न घेतलेल्या या उपोषणाची उच्च न्यायालयानं दखल घेतली असून "प्रत्येक नागरिकाचे जीवन मौल्यवान आहे आणि त्याचे संरक्षण करणे ही सरकारची जबाबदारी आहे," असे ताशेऱेही सरकारवर ओढलेत...तर दुसरीकडे कलाकारांनीही वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शववत उपोषण मागे घेण्याची विनंती केलीय.....

Sonam Wangchuk latest news
श्रीकृष्ण ५ वेळा नमाज पठण करायचे; मौलाना अन्सारींचं वादग्रस्त वक्तव्य, प्रभू रामचंद्रांवर बोलताना जीभ घसरली

वांगचुक यांनी मात्र संसदेवर काढण्यात येणार 20 जुलैच्या मोर्चाला पाठिंबा देण्याचं आवाहन केलंय.

दरम्यान या मुद्द्यावरून आता महाराष्ट्रातील राजकारणही तापू लागलयं... ठाकरेसेनेचं शिष्टमंडळ दिल्लीला जंतर मंतरवर जाणार आहे...तसचं वांगचुक यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी मुंबईतल्या आझाद मैदानावर मोठ्या संख्येनं तरुणाई जमली.

Sonam Wangchuk latest news
Maharashtra Weather : राज्यात वादळी वाऱ्यासह पुन्हा पावसाचं आगमन! 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट

सोनम वांगचुक यांचा संघर्ष नवा नाही. यापूर्वी लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा मिळावा यासाठी त्यांनी जोधपूर तुरुंगात 170 दिवस घालवले होते. 25 सप्टेंबर 2025रोजी लेहमध्ये झालेल्या कथित हिंसाचाराचा आरोप ठेवून त्यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत (NSA) कारवाई करण्यात आली होती. आता नीट पेपर लीकविरोधात ते मैदानात उतरले आहेत. त्यामुळे केंद्र सरकार केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? की 20 जुलैला संसदेवर काढण्यात येणाऱ्या मोर्चामुळे संघर्ष अधिक तीव्र होणार याकडे देशाचं लक्ष लागलंय.

भारत मोहोळकरसह गिरीश कांबळे, साम टिव्ही न्यूज, मुंबई

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com