

मौलाना जर्शीस अन्सारी यांनी भगवान श्रीकृष्ण यांच्याबाबत एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यावरून आता नव्या वादाला तोंड फुटले आहे. श्रीकृष्ण ५ वेळा नमाज पठण करत होते, असा दावा मौलाना अन्सारी यांनी केलाय. या वक्तव्यानंतर हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या असून राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी यावर तीव्र आक्षेप घेत कारवाईची मागणी केली आहे.
वादग्रस्त वक्तव्यात काय म्हटले आहे?
भगवान श्रीकृष्ण हे पाच वेळा नमाज पठण करायचे. विश्वास नसेल तर श्रीमद्भगवद्गीतेतील सहाव्या अध्यायातील दहावा मंत्र वाचून पाहा, असा दावा मौलाना अन्सारी यांनी केला आहे. त्यासोबतच "इस्लाम धर्म हा केवळ मुस्लिमांचा नाही; प्रभू रामचंद्र यांनी देखील हाच धर्म मांडला होता," असेही वादग्रस्त विधान त्यांनी केले आहे.
उद्योगमंत्री उदय सामंत काय म्हणाले ?
दोन धर्मांमध्ये जाणीवपूर्वक वाद निर्माण करण्यासाठी हे कटकारस्थान रचले गेले आहे का, याचा तपास पोलिसांनी करावा अशी मागणी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली आहे. तसेच, समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कडक कारवाई झाली पाहिजे, असे म्हणत त्यांनी या वक्तव्याचा जाहीर निषेध केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.