Ketan Agarwal : सिया-चेतनने गुपचूप लग्न केलं होतं? राजस्थानच्या 'त्या' मंदिरात पोलिसांच्या हाती काय लागलं?

Siya Goyal, Chetan Choudhary : केतन अग्रवाल हत्या प्रकरणात सिया गोयल आणि चेतन चौधरी यांनी राजस्थानच्या खाटू श्याम मंदिरात गुप्तपणे लग्न केल्याच्या दाव्याची पुणे ग्रामीण पोलिसांनी चौकशी केली. मात्र मंदिरातून कोणतेही सीसीटीव्ही पुरावे मिळाले नाहीत.
Ketan Agarwal Case
Ketan Agarwal CaseSaam Tv
Published On

Ketan Agarwal Case Update : पुण्यातील प्रसिद्ध व्यावसायिक केतन अग्रवाल खून प्रकरणात दररोज नवनवीन आणि धक्कादायक खुलासे होत आहेत. मुख्य आरोपी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी हत्येच्या चार महिने आधीच राजस्थानच्या प्रसिद्ध खाटू श्याम मंदिरात गुपचूप लग्न केले होते, असा दावा केला जात होता. या दाव्याची पडताळणी करण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांचे एक विशेष पथक थेट राजस्थानला पोहोचले होते.

पोलिसांनी या कथित लग्नाचे पुरावे गोळा करण्यासाठी मंदिरातील सीसीटीव्ही (CCTV) फुटेजची तपासणी केली; मात्र तपासादरम्यान पोलिसांना मंदिरातून कोणतेही फुटेज मिळू शकलेले नाही. व्हॉट्सॲप चॅटच्या आधारे समोर आलेल्या या गुप्त लग्नाच्या दाव्याला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नसून, पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

पोलिसांना पुरावे मिळाले का?

राजस्थानमधील खाटूश्याम मंदिरात पुणे ग्रामीण पोलिसांनी भेट दिली. डिसेंबर २०२५ मध्ये सिया आणि चेतन राजस्थान ट्रिपला गेले होते. त्यावेळी त्यांनी मंदिरात लग्न केल्याचे समोर आले होते. त्याचा तपास करण्यासाठी पुणे पोलीस राजस्थानला गेले होते. पण सिया आणि चेतन विरोधात राजस्थानमध्ये राजस्थानमध्ये कुठले ही पुरावे नसल्याची माहिती समोर आली आहे.

Ketan Agarwal Case
श्रीकृष्ण ५ वेळा नमाज पठण करायचे; मौलाना अन्सारींचं वादग्रस्त वक्तव्य, प्रभू रामचंद्रांवर बोलताना जीभ घसरली

नेमका आरोप काय ?

केतन अग्रवाल प्रकरणी राजस्थान ट्रिपचे धक्कादायक खुलासे काही दिवसांपूर्वी समोर आले हते. लग्ना ठरण्याआधी सियाने चेतनसोबत राजस्थान ट्रिप केली होती. फेब्रुवारीमध्ये ठरलेल्या लग्नापूर्वी चेतन आणि सिया त्यांच्या मित्र मैत्रिणींसोबत राजस्थानला ट्रीपला गेले होते. या दोघे राजस्थानमधील उदयपूर, जोधपूरमध्ये ते फिरले होते. 7 दिवसांचा दौऱ्यात पंचतारांकित हॉटेलमध्ये त्यांनी मुक्काम केल्याची माहिती मिळाली होती. चेतन चौधरी हा मूळचा राजस्थानमधील जोधपूरचा रहिवासी आहे. डिसेंबर 2025 मध्ये चेतनच्या मित्रांसोबत मेहरनगढ फिरण्यासाठीही सिया गेल्याचे समोर आले होते.

Ketan Agarwal Case
Maharashtra Weather : राज्यात वादळी वाऱ्यासह पुन्हा पावसाचं आगमन! 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट

सिया-चेतनला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

केतन अग्रवाल हत्या प्रकरणात सिया आणि चेतन यांची न्यायालयीन कोठडी कायम ठेवण्यात आली आहे. सिया व चेतन चौधरीची न्यायालयीन कोठडी १४ दिवसांनी वाढवण्यात आली आहे. चार्जशीटनंतर जामिनासाठी वकिलांकडून अर्ज केला जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या दोघांची १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी संपत असल्याने त्यांना वडगाव न्यायालयात ऑनलाइन पद्धतीने हजर केलं. गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांमध्ये चार्जशीट दाखल करण्यासाठी ९० दिवसांचा कालावधी असतो. चार्जशीट दाखल झाल्यानंतर त्याचा सखोल अभ्यास करूनच जामिनासाठी अर्ज करण्याचा निर्णय घेण्यात येण्याची शक्यता आहे.

Ketan Agarwal Case
सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीत खांदेपालट होणार? बड्या नेत्याच्या विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात उठली वावटळ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com