सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीत खांदेपालट होणार? बड्या नेत्याच्या विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात उठली वावटळ

Sunetra Pawar latest news : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्षपदावरून चर्चा रंगल्या असून आमदार संग्राम जगताप यांनीही या पदाबाबत सूचक भूमिका मांडली आहे.
Sunetra Pawar
Sunetra Pawar Saam Tv
Published On

सचिन बनसोडे, अहिल्यानगर प्रतिनिधी

Sangram Jagtap news : अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्षपदावरून रस्सीखेच सुरू असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. अशातच पक्षाचे आमदार संग्राम जगताप यांनीही या पदाबाबत आपली इच्छा अप्रत्यक्षपणे व्यक्त केली आहे.

मात्र, "अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठींचाच असेल," असे स्पष्ट करत त्यांनी संयमी भूमिकाही घेतली. रायगडचे खासदार सुनील तटकरे राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यामान प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांना कायम ठेवणार की दुसऱ्या नेत्याला संधी दिली जाणार? याची चर्चा सुरू झाली.

Sunetra Pawar
महाराष्ट्र हादरला! शिंदेसेनेच्या २ नगरसेवकांकडून गोळीबार; एकाचा मृत्यू, ४ जखमी, १६ जणांवर हत्येचा गुन्हा

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा कृषिमंत्री दत्ता भरणे यांनी नुकतेच एका कार्यक्रमात, "पक्षाच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी राज्याचे नेतृत्व केले आणि त्या मुख्यमंत्री झाल्या, तर मला आनंदच होईल," अशी भावना व्यक्त केली होती. यावर प्रतिक्रिया देताना आमदार संग्राम जगताप म्हणाले, "अजितदादांशी सर्वांचीच जवळीक आहे. त्याच भावनेतून दत्ता भरणे यांनी ते वक्तव्य केले असावे. मलाही तसेच वाटते. मात्र, जोपर्यंत पक्षाचा अधिकृत निर्णय होत नाही, तोपर्यंत त्यावर भाष्य करणे योग्य ठरणार नाही."

Sunetra Pawar
BJP worker shot : भरदिवसा थरार! भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार; महाराष्ट्र हादरला

दरम्यान, प्रदेशाध्यक्षपदाबाबत विचारले असता जगताप म्हणाले, "जसे सर्वांना वाटते, तसेच मलाही वाटते. मात्र, प्रत्येकाचीच इच्छा पूर्ण होईल असे नाही. ज्यांच्या नशिबात संधी असेल, त्यांनाच ही जबाबदारी मिळेल. पक्षाच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या मनात जे असेल, त्यानुसार त्या योग्य व्यक्तीवर ही जबाबदारी सोपवतील." संग्राम जगताप यांच्या या सूचक वक्तव्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीला आणि राजकीय चर्चांना आणखी बळ मिळाले आहे.

Sunetra Pawar
crime : भूलतज्ज्ञाची अपार्टमेंटमध्येच निर्घृण हत्या, ८ वर्षांचा मुलगाही गंभीर जखमी; डॉक्टर पत्नीच्या कृत्याने खळबळ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com