Rain Alert : १९ राज्यांना वादळी वाऱ्यांसह पाऊस झोडपून काढणार, ८० किमी वेगाने वाहणार वारे; हवामान खात्याचा इशारा

Rain Alert Across 19 States IMD Warns Of Thunderstorms And Strong Winds : मान्सून केरळमध्ये दाखल झाल्यानंतर हवामान विभागाने उद्या, शुक्रवारी देशातील १९ राज्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.
19 राज्यांना उद्या पाऊस झोडपून काढणार
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, उद्या शुक्रवारी १९ राज्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. Saam TV
Published On

मान्सूनची प्रतीक्षा संपली आहे. भारतातील केरळमध्ये आज, गुरुवारी मान्सूनचं आगमन झाल्याचं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं. येत्या दोन ते तीन दिवसांत महाराष्ट्रात मान्सून धडकेल असा अंदाज आहे. तसेच उद्या शुक्रवारी, ५ जून रोजी देशातील जवळपास १९ राज्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. देशाच्या विविध भागांत विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, देशातील १९ राज्यांमध्ये उद्या शुक्रवारी पावसासह ७० ते ८० किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. सर्वाधिक फटका हा पूर्वेकडील राज्यांना बसू शकतो. वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा या राज्यांना बसेल, असा अंदाज आहे.

५ जून रोजी देशाची राजधानी दिल्ली आणि आजूबाजूच्या परिसराला पाऊस झोडपून काढणार असल्याचा अंदाज आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, संपूर्ण दिवस ढगाळ वातावरण राहू शकतो. दिल्ली -एनसीआरमध्ये दोन सत्रांत वातावरणात बदल होऊ शकतो. सकाळपासून दुपारपर्यंत पावसाचा अंदाज आहे. काही तास विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह ४०-५० किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहतील. तर संध्याकाळपासून रात्रीपर्यंत हलक्या स्वरुपाचा पाऊस पडू शकतो.

मान्सून सक्रिय झाल्याने केरळ, कर्नाटक आणि ईशान्य भारतात पुढील पाच ते सात दिवस मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज आहे. हवामान खात्यानं या राज्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. विशेषतः ५ जून रोजी कर्नाटकातील काही भागांत मुसळधार पाऊस कोसळेल. याशिवाय आसाम, मेघालय आणि अरुणाचल प्रदेशात मुसळधार पावसासह ४०-५० किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे.

19 राज्यांना उद्या पाऊस झोडपून काढणार
Monsoon Update 2026 : मान्सून सर्वात शेवटी कोणत्या राज्यात पोहोचतो? कारण जाणून घ्या

जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंडच्या काही भागात ५ जून रोजी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. पंजाब, हरयाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह पाऊस आणि वादळी वाऱ्याचा अंदाज आहे.

दक्षिणेकडील केरळ राज्यात मान्सूनने धडक दिली असली तरी काही राज्यांमध्ये अद्याप उष्णतेचे चटके सोसावे लागू शकतात. आयएमडीच्या अंदाजानुसार, ओडिशा, आंध्र प्रदेशचा किनारी भाग, तामिळनाडू आणि ईशान्येकडील काही भागांत उद्या, शुक्रवारी उष्ण आणि दमट वातावरण असेल. बिहारमध्ये ६ जूनपासून पुन्हा उष्णतेची लाट येऊ शकते असा अंदाज आहे. त्यामुळे उद्या या राज्यातील तापमानात वाढ होऊ शकते. दुसरीकडे खराब हवामान आणि उंच लाटा उसळण्याची शक्यता लक्षात घेऊन हवामान विभागाने केरळ, कर्नाटकसह काही भागांत ९ जूनपर्यंत समुद्रात खोलवर मासेमारीसाठी जाण्यास मनाई केली आहे.

19 राज्यांना उद्या पाऊस झोडपून काढणार
गॉडझिला अलनिनोचं भारतावर महासंकट? 3 महिने दुष्काळ किंवा पूर स्थिती राहणार?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com