गॉडझिला अलनिनोचं भारतावर महासंकट? 3 महिने दुष्काळ किंवा पूर स्थिती राहणार?

Extreme Weather Alert: हवामान बदलाचे चटके संपूर्ण जग सहन करत असतानाच, प्रशांत महासागरामध्ये 'गॉडझिला अल निनो' सक्रिय होतोय. त्यामुळे गॉडझिला अल निनोमुळे येत्या 3 महिन्यांत देशात भीषण दुष्काळ किंवा महापुराचं संकट कसं ओढवू शकतं... पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...
Rising ocean temperatures signal the onset of ‘Godzilla El Niño,’ raising concerns over extreme weather events in India.
Rising ocean temperatures signal the onset of ‘Godzilla El Niño,’ raising concerns over extreme weather events in India.saam tv
Published On

भारतीय हवामान विभागापाठोपाठ आता जागतिक हवामान संघटनेने गॉडझिला अल निनोचा भयंकर इशारा दिलाय... यामुळे देशात पुढील तीन महिने दुष्काळ किंवा पुराचा मोठा धोका निर्माण होऊ शकतो असा अंदाज वर्तवण्यात आलाय.. त्यामुळे 'गॉडझिला अल निनो' किती घातक आहे...

'गॉडझिला अल निनो' हे हवामानाचे सर्वात भयानक आणि रौद्र रूप मानलं जातं...ऑस्ट्रेलिया आणि भारतासह जगातील अनेक देशांमध्ये पावसाचे प्रमाण कमालीचे घटून ३ महिने दुष्काळसदृश स्थिती निर्माण होऊ शकते. काही भागांमध्ये एकाच वेळी ढगफुटी आणि महापुराचे संकट येऊ शकते. समुद्राच्या आणि जमिनीच्या तापमानात विक्रमी वाढ होऊन जीवघेण्या उष्णतेच्या लाटा येईल, अशीही शक्यता वर्तवली जातेय....

दरम्यान जागतिक पातळीवर 'गॉडझिला अल निनो'चे सावट असताना, महाराष्ट्रात मात्र गेल्या दोन दिवसांत उन्हाचा तडाखा काहीसा कमी झालाय. राज्यातील 18 जिल्ह्यांमध्ये तापमान 40 अंशाच्या खाली घसरले असून, हवामान विभागाने पुढील 48 तासांसाठी 9 जिल्ह्यांना पावसाचा 'यलो अलर्ट' जारी केलाय... मात्र 'गॉडझिला अल निनो'पासून भारताच्या सुरक्षेसाठी दोन हवामान प्रणाली सक्रिय राहिल्या, तर अल निनो असूनही भारतात मान्सूनचा बचाव होऊ शकतो...

गॉडझिला अलनिनोपासून बचाव कसा?

1) इंडियन ओशन डायपोल याला 'हिंद महासागराचा अल निनो' असेही म्हणतात. जर यंदा आयओडीचा टप्पा 'पॉझिटिव्ह' राहिला, तर तो अल निनोच्या दुष्काळी प्रभावाला पूर्णपणे नष्ट करण्याची ताकद ठेवतो आणि भारतात चांगला पाऊस पडू शकतो....

2) मॅडेन-ज्युलियन ऑस्सिलेशन हे ढग आणि वाऱ्यांचे एक जागतिक चक्र आहे, जे विषुववृत्तावर सतत फिरत असते. जेव्हा हे चक्र भारताच्या आकाशावरून जाते, तेव्हा कमकुवत झालेल्या मान्सूनमध्येही मुसळधार पावसाच्या सरी खेचून आणते.ज्यामुळे गॉडझिला अल निनोपासून भारताचे संरक्षण होईल...

दरम्यान जागतिक पातळीवर अल निनोचे ढग गडगडत असताना आणि राज्यात अवकाळी पावसाचे सावट असताना, यंदाचा मान्सून कसा राहणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलयं....गॉडझिला अल निनोचा सामना करण्यासाठी आणि शेतकऱ्यांचं नुकसान टाळण्यासाठी सरकार काय उपाय योजना करणार याकडे लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com